24 November 2020

News Flash

सौंदर्या खुलवण्यापासून ते भांडी चमकवण्यापर्यंत जाणून घ्या लिंबाच्या सालीचे भन्नाट फायदे

सौंदर्य खुलवण्यापासून ते भांड्यांचा चिकटपणा घालवण्यापर्यंत लिंबाच्या सालीचा केला जातो वापर

लिंबाचे अनेक फायदे आहेत. कधी वजन कमी करण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो तर कधी पदार्थांची चव वाढवण्यासाठी. लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असतात. त्यामुळे लिंबामधील फायबरचा पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयोग केला जातो. लिंबाच्या रसाचा वापर करून झाल्यानंतर अनेकजण त्याची साली फेकून देतात. पण तुम्हाला माहित आहे का लिंबाच्या सालीचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. चला जाणून घेऊया कशाप्रकारे लिंबाच्या सालीचा वापर केला जातो…

>चहा किंवा कॉफी तयार करताना भांड्यावर जमा होणारा काळा थर काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर होऊ शकतो.

>अनेकदा जेवणाच्या भांड्याला आतून चिवटपणा राहतो. साबणाने देखील हा चिवटपणा जात नाही. अशावेळी लिंबाच्या सालीने भांडी घासली की चिवटपणा लगेच निघून जातो.

>कुकरमध्ये भात शिजवताना कुकर आतून काळा पडतो. अशावेळी खाली पाण्यासोबत लिंबाची एक साल देखील ठेवावी. सालीमुळे कुकर आतून काळा होत नाही.

>फ्रिजमध्ये जर दुर्गंध येत असेल तर लिंबाच्या साली ठेवाव्या. सालींच्या वासाने फ्रिजेमधील दुर्गंधी कमी होते.

>घरात मुंग्या येत असतील तर त्या जिथून येतात तिथे लिंबाची साल ठेवावी. असे केल्याने मुंग्या किंवा इतर छोट्या कीटकांचा त्रास कमी होतो.

>लिंबांच्या सालीचा वापर करून तुम्ही नखं स्वच्छ करण्यासाठी करु शकता.

>लिंबाची साल पाय किंवा हातांच्या बोटावर अलगद फिरवल्यास नखं तर स्वच्छ होतातच पण नखांवर एक वेगळीच चमक देखील येते.

>हाताचे कोपरे काळवंडले असतील तर त्या ठिकाणी लिंबाच्या सालीने मसाज केल्याच काळवंडलेली त्वचा उजळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 4:38 pm

Web Title: 7 benifits of lemon peel avb 95
Next Stories
1 सतत पोट दुखतंय? मग करा ‘हे’ सहा घरगुती उपाय
2 कुरकुरे, अंकल चिप्स खरेदी केल्यास मिळेल फ्री 2GB डेटा, Airtel ची भन्नाट ऑफर ; जाणून घ्या डिटेल्स
3 1 सप्टेंबरपासून देशात ‘वीज बिल माफी’ योजनेअंतर्गत प्रत्येकाचं बिल माफ होणार? जाणून घ्या सत्य
Just Now!
X