ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर Electronics Sale सुरू असून या सेलमध्ये युजर्स अनेक स्मार्टफोन कमी किंमतीत आणि आकर्षक डिस्काउंटसह खरेदी करु शकतात. जर तुम्ही सॅमसंगचा पॉवरफुल बॅटरीचा Samsung Galaxy F62 हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यावरही आकर्षक ऑफर्स आहेत. सॅमसंगने गेल्या महिन्यातच भारतात तब्बल 7000mAh बॅटरी क्षमता असलेला  Samsung Galaxy F62 हा नवीन मिडरेंज स्मार्टफोन लाँच केला आहे. Samsung Galaxy F62 मध्ये पंचहोल डिस्प्ले आहे. याशिवाय क्वॉड कॅमेरा सेटअप असून Exynos 9825 प्रोसेसर दिलं आहे. हे एक ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. सॅमसंगच्या या फोनची टक्कर OnePlus Nord, Realme X3 SuperZoom आणि Realme X7 5G यांसारख्या स्मार्टफोनसोबत असेल.

काय आहे ऑफर?:-
फ्लिपकार्टच्या इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये  Samsung Galaxy F62 हा फोन 7 हजार 200 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करता येऊ शकतो. पण यासाठी ग्राहकांना Flipkart Smart Upgrade प्लॅनचा वापर करावा लागेल. म्हणजे Flipkart Smart Upgrade अंतर्गत फोन खरेदी करतेवेळी ग्राहकांनी क्रेडिट कार्ड किंवा Bajaj Finserv च्या ईएमआय कार्डद्वारे व्यवहार केल्यास 7200 रुपये डिस्काउंट मिळेल. याशिवाय फोनच्या खरेदीवर अन्य काही ऑफर्सही आहेत. यानुसार फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर पाच टक्के अनलिमिटेड कॅशबॅकची ऑफरही मिळू शकते. शिवाय दरमहा 4000 रुपये नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी आहे. Samsung Galaxy F62 ची बेसिक किंमत 23 हजार 999 रुपये आहे. ही किंमत 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मॉडेलची किंमत 25 हजार 999 रुपये आहे. पण, Flipkart Smart Upgrade अंतर्गत याच्या खरेदीवर  7 हजार 200 रुपये डिस्काउंट मिळाल्यावर अनुक्रमे 16 हजार 799 रुपये आणि 17 हजार 800 रुपयांत हा फोन खरेदी करता येईल.

Samsung Galaxy F62 स्पेसिफिकेशन्स :-
फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्टसोबत अँड्रॉइड 11 आधारित One UI 3.1 आहे. फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. याशिवाय फोनमध्ये ऑक्टाकोर Exynos 9825 प्रोसेसरही आहे. 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनचं स्टोरेज मेमरी कार्डच्या मदतीने 1 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. हा फोन लेजर ब्लू, लेजर ग्रीन आणि लेजर ग्रे अशा तीन कलर्समध्ये उपलब्ध असेल. फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप अर्थात मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. त्यातील 64 मेगापिक्सलचा सोनी IMX682 सेन्सर मुख्य कॅमेरा आहे, तर दुसरा 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल, तिसरा 5 मेगापिक्सेल मॅक्रो आणि चौथा 5 मेगापिक्सेलचा डेफ्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. रिअर आणि फ्रंट दोन्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते. शिवाय, फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, NFC, USB टाइप-सी पोर्ट आणि 3.5एमएम हेडफोन जॅक मिळेल. फोनमध्ये साइड माउंटेड पॉवर बटणमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याशिवाय यामध्ये 25W फास्ट चार्जिंगसोबतच रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट असलेली 7000mAh क्षमतेची बॅटरी आहे.