14 October 2019

News Flash

रसरशीत आंबे खाण्याचे आठ फायदे

हापूस, तोतापूरी, पायरी, बदामी अशा विविध प्रकारातील आंबे चवीला जितके मधूर असतात तितकेच आरोग्यालाही पौष्टिक असतात.

उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतो. उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे नको नको होणारा हा उन्हाळा केवळ आंब्यासाठी नक्की सुसह्य असू शकतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप आवश्यक आहेत. हापूस, तोतापूरी, पायरी, बदामी अशा विविध प्रकारातील आंबे चवीला जितके मधूर असतात तितकेच आरोग्यालाही पौष्टिक असतात. मात्र कोणतीही गोष्ट किती खायची याला काहीतरी प्रमाण असावे अन्यथा त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. पाहूयात आंबे खाण्याचे शरीराला असणारे फायदे…

– आंबा खाल्ल्याने वजन वाढते असा समज असतो. मात्र तो चुकीचा असून वजन कमी करण्यासाठी आंबा फायदेशीर ठरतो.

– आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे पुरेशा प्रमाणात असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायलाच हवे.

– आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.

– आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.

– आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.

– फिजिशियनच्यामते, एक सर्वसाधारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामांपेक्षा अधिक पौष्टिक आहे. आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू (उत्ती) व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

– ‘व्हिटामिन बी6’ मुळे रक्तातील ‘होमोसेस्टीना’चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो.

– आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते.

First Published on May 14, 2019 12:21 pm

Web Title: 8 health benefits of eating mango in summer season