14 October 2019

News Flash

८ जीबी रॅम असणारा Vivo V15 Pro होणार लाँच, जाणून घ्या किंमत, फिचर्स

या फोनमध्ये अनेक भन्नाट फिचर्स असणार आहेत...

स्मार्टफोन बनवणारी विवो कंपनी पुढील आठवड्यात भारतात आपला ८ जीबी रॅमचा Vivo V15 Pro हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. सध्या Vivo V15 Pro चा ६ जीबी रॅम असणारा मोबाइल भारतात उपलब्ध आहे. हा नवीन वेरिएंटचा मोबाइल विवो आता भारतात लाँच करणार आहे. याची किंमत अंदाजे ३२ हजार रूपये असणार आहे. सहा जीबी रॅम वाल्या विवोची सध्याची किंमत २८ हजार ९९० रुपये आहे.

लवकरच ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारात हा स्मार्टफोन उपलब्ध असेन. 32MP पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला हा जगातील पहिला फोन असल्याचा दावा विवो कंपनीने केला आहे. Vivo V15 Pro मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलं असून 0.37 सेकंदांमध्ये फोन अनलॉक होईल असा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा डिस्प्लेच्या मागे लपलेला आहे आणि सेल्फीसाठी क्लिक केल्यानंतर कॅमेरा आपोआप पॉप-अप होतो.

Vivo V15 Pro फिचर्स –
– ६.३९ इंचाचा एचडी अमोल्ड डिस्प्ले
– इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर
– फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सलचा क्वॉड पिक्सल सेंसर असून ८ व ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
– सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा
– फोन स्टोरेज २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो.
– ३७०० एमएएच बॅटरीची क्षमता आहे.
– Android Pie ऑपरेटींग सिस्टम
– फोनमध्ये क्वॅालकॅम स्नॅपड्रॅगन ६७५ प्रोसेसर

First Published on May 10, 2019 5:24 pm

Web Title: 8gb vivo v15 pro in very soon will launch in india