18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

भारतामध्ये कमी वजनाची ९७ दशलक्ष मुले

लठ्ठपणामध्ये चार दशकांत दहापट वाढ

पीटीआय, लंडन | Updated: October 12, 2017 2:31 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

लठ्ठपणामध्ये चार दशकांत दहापट वाढ

जगभराच्या तुलनेत भारतामध्ये सर्वात जास्त मध्यम आणि अतिशय कमी वजन असणारी लहान आणि किशोरवयीन मुले आहेत. तसेच लठ्ठपणा वाढणाऱ्या मुलांचे प्रमाणही मागील चार दशकांत दहापटीने वाढले असल्याचे एका अभ्यासात म्हटले आहे. ‘लॅन्सेट’ नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये २०१६ मध्ये भारतातील जवळपास ९७ दशलक्ष लहान आणि किशोरवयीन मुलांचे वजन प्रमाणित वजनापेक्षा अतिशय कमी किंवा मध्यम असल्याचे आढळून आल्याचे म्हटले आहे.

ब्रिटनच्या इंपेरिअल कॉलेज लंडन आणि जागतिक आरोग्य संघटनेला २४.४ टक्के मुली आणि ३९.३ टक्के मुले कमी वजनाची आढळून आली. १९७५ च्या तुलनेत हे प्रमाण २२.७ आणि ३०.७ टक्के असल्याचे दिसून आले. सरकारची कमालीची उदासीनता यास कारणीभूत असून, जर सध्याची स्थिती कायम राहिल्यास २०२२ मध्ये कमी वजन असणाऱ्या मुलांच्या प्रमाणात गंभीर प्रमाणात वाढ नोंदविली जाण्याचा इशारा अभ्यासात देण्यात आला आहे. संशोधकांच्या गटाने पाच वर्षांमध्ये ५ ते १९ वर्षे वयाच्या जवळपास १३० दशलक्ष मुलांचे वजन आणि उंची यांचे विश्लेषण केले.

तसेच २० किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ९७.४ दशलक्ष मुलांचे वजनही या वेळी तपासण्यात आले. मागील चार दशकांमध्ये लठ्ठपणा येण्याचे प्रमाण जगभरामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.  हे प्रमाण कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्येही वाढत आहे.  अतिउच्च उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये लठ्ठपणा येण्याचे प्रमाण अविश्वसनीय वाटावे इतके वाढले असल्याचे संशोधकांनी सांगितले.

 

First Published on October 12, 2017 2:31 am

Web Title: 97 million children has low weight in india