News Flash

श्वानाने दिला हिरव्या रंगाच्या पिल्लाला जन्म, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

या पिल्लाचं नाव हल्क आहे

श्वान हा अनेकांच्या आवडीचा प्राणी आहे. त्यामुळे या श्वानप्रेमींची संख्या जगभरामध्ये काही कमी नाही. यात काही ठराविक प्रजातींच्या श्वानांना विशेष पसंती असते. यात लॅब्राडोर, जर्मन शेफर्ड यासारखे श्वान हे जास्त लोकप्रिय असतात. या प्रजातींमध्ये अधिकांश श्वान हे काळ्या, पांढऱ्या, तपकिरी रंगामध्ये असतात. परंतु जर एखादा श्वान हा हिरव्या किंवा अन्य रंगाचा असेल असं कोणी म्हटलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? सहाजिकचं कोणाचा त्यावर विश्वास बसणार नाही. परंतु ही घटना कॅलिफोर्नियामध्ये घडली आहे.

सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याच्या पिल्लाचा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या पिल्लाचं नाव हल्क असं असून तो अन्य पिल्लांपेक्षा वेगळ्या रंगाचा आहे.


कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या एका महिलेच्या घरी व्हाइट जर्मन शेफर्ड प्रजातीची जिप्सी नावाची श्वान असून तिने काही दिवसांपूर्वी पिल्लांना जन्म दिला. या साऱ्या पिल्लांमध्ये एका पिल्लाचा रंग वेगळा आहे. हे पिल्लू चक्क हिरव्या रंगाचं आहे.
दरम्यान, या पिल्लाला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहींना ते प्रचंड आवडलं आहे. कॅलिफोर्निया येथील एका स्थानिक रिपोर्टरने त्याच्या ट्विटरवरुन या पिल्लाचा फोटो शेअर केला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 2:26 pm

Web Title: a dog gives birth to a green puppy now named hulk ssj 93
Next Stories
1 पॅन-आधार लिंक नसेल तरी ‘नो टेंशन’, उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय
2 केवळ 10 रुपयांत 1GB डेटा आणि कॉलिंगही, जिओची भन्नाट ऑफर
3 एका चार्जिंगमध्ये 340 किमी प्रवास? MG ZS EV आज होणार लाँच
Just Now!
X