सध्या केसांची गळती आणि अवकाळी ‘टाळू’दर्शनाचे प्रमाण वाढत आहे. टक्कलाच्या वैश्विक समस्येमुळे विविध कंपन्यांची टक्कलनाशक औषधे, भरमसाठ  शूल्क घेणाऱ्या चिकित्सामार्गाचे पेव फुटले आहे. टीव्हीवरील टक्कलमुक्तीच्या प्रलोभनांपैकी खरी कुठली आणि खोटी कुठली, याची कल्पना ‘टक्कल’सामान्यांना नाही. याधर्तीवर वैज्ञानिक तथ्यांनी टकलाच्या समस्येचा खरोखरीच अंत नजीकच्या काळात होणार आहे. कोलंबिया विद्यापीठ वैद्यकीय केंद्राने केसाचे फॉलिकल (केसांचा बीजकोश) व अॅलोपेसिया एरेटासह नष्ट करणाऱ्या विशिष्ट पेशींचा शोध लावला आहे.
प्रतिकारशक्तीच्या विशिष्ट आजारामुळे  माणसाला टक्कल पडते असा वैज्ञानिकांचा दावा आहे. त्यामुळे नव्या औषधामध्ये प्रतिकारशक्ती प्रणालीच्या पेशींचा समावेश करून अभ्यासकांनी तीन रुग्णांवर पाच महिन्यात केस उगवण्याचे तंत्र यशस्वी केले आहे.  प्राथमिक निष्कर्षांत टकलावरील औषधाच्या चाचण्या सुरू असून त्यानंतर अन्न व औषध प्रशासन त्याला मान्यता देईल.
अॅलोपेसिया एरेटामुळे डोक्यावरचे केस जाण्याचे कारण म्हणजे प्रतिकारशक्ती प्रणालीतील काही पेशी केसांच्या फॉलिकल्सवर हल्ला करतात त्यामुळे केस गळतात व टक्कल पडत जाते, असे संशोधनाअंती स्पष्ट झाले.
प्रतिकारशक्ती प्रणालीतील टी पेशींना फॉलिकल्सवर हल्ला करण्याचा आदेश मिळतो त्यामुळे नवीन औषधात टी पेशींना असा संदेश मिळणार नाही अशी प्रणाली तयार करण्यात आली आहे    या औषधांचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा आहे. उपचार थांबवूनही काही महिने हे केस राहतात. या औषधाला एफडीएने मान्यता दिली आहे. तीन लोकांवर त्याचा प्रयोग करण्यात आला असता चार ते पाच महिन्यात त्यांच्या केसांची वाढ पूर्ववत झाली व टी पेशींचा हल्ला थोपवला गेला त्यामुळे हे घडून आले असे ‘नेचर मेडिसिन’ या नियतकालिकाने म्हटले आहे. नव्या औषधामुळे भविष्यात टक्कलावर लगेचच मात करता येऊ शकेल, असे अभ्यासगटाचे प्रमुख राफेल क्लायनेस यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत त्वचारोग व जनुकशास्त्र विभागाच्या अँजेला एम ख्रिस्तियानो या सहभागी झाल्या होत्या.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…
Queues at reservation centers due to technical glitch in STs app
एसटीच्या ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे आरक्षण केंद्रांवर रांगा