Aarogya Setu अ‍ॅपनंतर आता नीती आयोगाने ‘आरोग्य सेतू मित्र’ (AarogyaSetu Mitr)वेबसाइट लॉन्च केली आहे. या वेबसाइटद्वारे घरबसल्या लोकांना आरोग्य सेवा पुरवण्याचा उद्देश आहे. या वेबसाइटद्वारे नागरिकांना घरबसल्या वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील.

AarogyaSetu Mitr या वेबसाइटवर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला, ई-फार्मसी आणि होम लॅब टेस्ट यांसारख्या सेवा मिळतील. यासाठी ‘आरोग्य सेतू मित्र’ने इ-संजिवनी ओपीडी (eSanjeevaniOPD), स्वस्थ (Swasth), स्टेपवन (StepOne), टाटा हेल्थ आणि टेक महिंद्राच्या कनेक्टसेन्स टेलीहेल्थसोबत भागीदारी केली आहे. याद्वारे व्यापक स्तरावर लोकांना कोविड-19 संबंधी डॉक्टरांचा सल्ला देण्याचा प्रयत्न आहे. यात नागरिक डॉक्टरांशी कॉल, चॅट किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधू शकतात. याशिवाय होम लॅब टेस्टचीही सुविधा मिळेल.

global capital market, samir arora, mutual fund, samir arora journey in market, samir arora and global market journey, samir arora work, helios mutual fund, alliance capital management, asset management comapanies, hdfc limited, hdfc bank, samir arora thoughts in hdfc merge,
बाजारातील माणसं : जागतिक भांडवल बाजारातील अनुभवी खेळाडू : समीर अरोरा
Beer companies face dry day due to water shortage
पाणीटंचाईमुळे बिअर कंपन्यांवर ‘ड्राय डे’चे सावट
This pictorial story of Lalbagh Botanic Garden during both Bangalore and Bangalore eras
निर्जळगावातलं निसर्गबेट
Ola Uber Pune
ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…

आता तुम्हाला आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये एक नवीन AarogyaSetu Mitr सेक्शन दिसेल. त्याचा वापर तुम्ही बॅनरवर क्लिक करुनही करु शकतात. याशिवाय कोणत्याही ब्राउझरमधून https://www.aarogyasetumitr.in/ ही वेबसाइट अ‍ॅक्सेस करता येईल. आरोग्य सेतू मित्र वेबसाइटवर गेल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला, इ-फार्मसी आणि होम लॅब टेस्ट हे तीन पर्याय दिसतील. ऑनलाइन औषधांची होम डिलिव्हरी करण्यासाठी आरोग्य सेतू मित्रने 1mg, NetMeds, PharmEasay, आणि MedLife यांच्यासोबत भागीदारी केली आहे. याशिवाय होम लॅब टेस्ट Dr. Lal PathLbs, Metropolis यांच्याद्वारे होईल.