News Flash

प्रवाशांसाठी गुड न्यूज! IRCTC वर आता बसचं तिकीट होणार बूक, AbhiBus सोबत भागीदारी

ट्रेनमध्ये वेटिंग लिस्ट असल्यास प्रवासी लगेच बसचा पर्याय निवडू शकतात

(संग्रहित छायाचित्र)

ऑनलाइन ई-तिकीट प्लॅटफॉर्म AbhiBus ने गुरुवारी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिज्म कॉर्पोरेशन अर्थात IRCTC सोबत भागीदारी केल्याची घोषणा केली. यामुळे आता IRCTC चे युजर्स बस तिकीटही ऑनलाइन बूक करु शकणार आहेत.

या भागीदारीमुळे आयआरसीटीसीवर जवळपास एक लाख बस मार्गांवर तिकीट बूक करता येईल. ग्राहक त्यांच्या आवश्यकतेनुसार एसी/नॉन-एसी बसचं तिकीट बूक करु शकतील. IRCTC वर दररोज 9 लाखांपेक्षा जास्त ट्रेन तिकीट बूक केले जातात. तर, AbhiBus ने Abhibus.com आणि आपल्या मोबाइल अ‍ॅपद्वारे ई-तिकीट प्लॅटफॉर्म सुरू केल्यापासून आतापर्यंत 4.5 कोटी कस्टमर्सचा डेटा गोळा केला आहे. या भागीदारीसह आपल्या प्रवाशांसाठी ट्रॅव्हल बूकिंग प्रक्रिया सोपी व्हावी हा आयआरसीटीसीचा उद्देश आहे.

AbhiBus सोबत झालेल्या भागीदारीमुळे ट्रेनमध्ये वेटिंग लिस्ट असल्यास प्रवासी लगेच बसचा पर्याय निवडू शकतात. यासाठी त्यांना दुसऱ्या कोणत्याही अ‍ॅपवर जाण्याची आवश्यकता नाही. सध्या विविध राज्यांच्या परिवहन विभागांशी भागीदारीअंतर्गत AbhiBus वर गेल्या तीन महिन्यांपासून दररोज 30 हजारापेक्षा जास्त बूकिंग होत आहे. या भागीदारीनंतर युजर्स 1 लाखापेक्षा जास्त मार्गांवर बसची सेवा वापरु शकतात, असं आयआरसीटीसीने म्हटलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 12:58 pm

Web Title: abhibus to offer bus ticket booking facility on irctc platform check details sas 89
Next Stories
1 Motorola च्या सर्वात स्वस्त स्मार्टफोनचा पहिलाच ‘सेल’, किंमत फक्त…
2 5000mAh बॅटरी + 64MP कॅमेरा, Samsung चा नवीन स्मार्टफोन Galaxy A32 4G आला
3 शारीरिक समस्यांवरही कापूर आहे गुणकारी; जाणून घ्या फायदे
Just Now!
X