भारताच्या टेलीकॉम कंपन्यांमध्ये काही वर्षांपासून स्पर्धा सुरू आहे. विशेष म्हणजे रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल यांच्यात अनेक दिवसांपासून ‘कांटे की टक्कर’ नेहमीच पाहायला मिळतेय. नेटवर्क स्पीड आणि कव्हरेजची पाहणी करणारी कंपनी ओपन सिग्नलने आपला नवा अहवाल सादर केला आहे. १ डिसेंबर २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत केलेल्या पाहणीनंतर हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

ओपन सिग्नलच्या रिपोर्टनुसार, देशात 4G डाऊनलोड स्पीडच्या बाबतीत एअरटेलने जिओ, व्होडाफोन आणि आयडीया यांसारख्या आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे, 4G डाऊनलोड स्पीडच्या बाबतीत जिओ सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. याशिवाय 4G/3G ओव्हरऑल डाऊनलोड स्पीडमध्ये एअरटेल नंबर एक ठरलं आहे. तर, केवळ 3G डाऊनलोड स्पीडच्या बाबतीतही एअरटेलनेच बाजी मारली आहे. जिओला केवळ उपलब्धतेच्या बाबतीतच एअरटेलवर मात करता आली असून यामध्ये जिओ अव्वल ठरलं आहे.

ओपन सिग्नलच्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या सहा महिन्यांमध्ये देशआतील 4G नेटवर्कची स्थिती काही प्रमाणात सुधारली असून देशातील अग्रगन्य कंपन्यांनी ६५ टक्के LTE उपलब्धतेचा आकडा गाठला आहे.

कोणाचा 4G डाऊनलोड स्पीड किती –
एअरटेल – 9.31 Mbps
आयडीया – 7.27 Mbps
व्होडाफोन – 6.98 Mbps
जिओ – 5.13 Mbps

कोणाचा 4G/3G ओव्हरऑल डाऊनलोड स्पीड किती –
एअरटेल – 6 Mbps.
जिओ – 5.1 Mbps