अॅसिड हल्ल्यात संपूर्ण चेहरा भाजलेली आणि एक डोळा गमावलेली रेश्मा कुरेशी हिने न्यूयॉर्क फॅशन विकमध्ये रँम्प वॉक केला. आतापर्यंत अॅसिड हल्ल्याच्या भयाण जखमा चेह-यावर घेऊन वावरणारी रेश्मा काहीशी दुर्लक्षित होती. आपला सुंदर चेहरा या हल्ल्यात तिने गमावला होता. अॅसिड हल्ल्यातल्या पिडित महिलांचे मानसिक खच्चीकरण होतेच पण जगाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो. रेश्माने हा दृष्टीकोन बदलत अत्यंत आत्मविश्वासाने न्यूयॉर्क फॅशनविकमध्ये रॅम्पवॉक केला.  ‘माझ्यासोबत जे काही झाले त्यात माझी चूक नव्हती. अशा हल्ल्यानंतर लोकांची माझ्याकडे बघण्याची दृष्टी बदलली. पण मला त्यांची सहानभूती नको होती. मी इतर सामान्य मुलींसारखी आहे आणि मीही काहितरी करु शकते हे मला जगाला दाखवायचे होते’ असेही ती आत्मविश्वासाने सांगते.

न्यूयॉर्क फॅशनवीक हा जगातील एक मोठा फॅशन इव्हेंट मानला जातो. या फॅशन वीकमध्ये जगभरातील अनेक नामवंत फॅशन डिझायनर्स आपले कलेक्शन सादर करतात. भारतीय डिझायनर आकृती कोचर हिचे कलेक्शन रेश्माने सादर केले. अनेक परदेशी माध्यमांचे लक्षही तिने आपल्याकडे खेचले त्यामुळे आज सगळीकडेच रेश्माच्या नावाची चर्चा आहे. २००४ मध्ये रेश्मावर अॅसिड हल्ला झाला होता. या हल्ल्यात तिचा चेहरा हा संपूर्ण भाजला, तर एक डोळाही तिने गमावला. न्यूयॉर्क फॅशनवीकमध्ये रॅम्पवॉक केल्यानंतर सगळ्यांना तिच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. अॅसिडच्या खुलेआम विक्रीविरोधात रेश्माने ‘एण्ड अॅसिड सेल’ या नावाने मोहिम सुरू केली. माध्यमांचे लक्ष वेधल्यानंतर या प्रकरणामुळे आपल्या आयुष्यात याचा नक्कीच फरक पडेल असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. याआधी रेश्माने ब्युटी टिप्स देतानाचा व्हिडिओ युट्युबवर टाकला होता. फक्त सुंदर मुलीच ब्युटी टिप्स देऊ शकता ही संकल्पना तिने खोडून टाकली.  पण याच बरोबर अॅसिडची खुलआमा होणारी विक्री रोखण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा असा संदेशही तिने यातून दिला होता. या व्हिडिओला कान मधील ‘ग्लासः लायन फॉर चेन्ज अवॉर्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. रेश्मा ही फक्त १९ वर्षांची आहे.

Horrific accident to speedy Scorpio 3 dead 5 injured in buldhana
बुलढाणा : भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात, ३ ठार, ५ जखमी
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…