जास्त प्रमाणात तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्यामुळे अनेकांना गॅस व पित्तासारख्या गोष्टींचा त्रास होतो. पोटाशी संबंधित अशा समस्या कोणालाही होऊ शकतात. आज ऊन तर उद्या पाऊस अशा वातावरणामध्ये अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांनाच पोटासंदर्भातील त्रास होण्याची शक्यता असते. पोटात गॅस होणे तसेच छातीत जळजळ होणे यासारख्या समस्या तर अनेकांना आहेत. यापासून लवकरात लवकर आराम मिळावा यासाठी अनेकजण वेगवगेळ्या प्रकराची औषधं आणि गोळ्या घेत असतात. मात्र या समस्या अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाल्या आहेत. अशावेळी या समस्यांवर मात करण्यासाठी नेमकं काय केले पाहीजे जाणून घेऊया.

आजच्या मॉडर्न लाइफस्टाइलमध्ये अनेकजण आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसत नाही. अनेकदा शिळे खाद्य पदार्थ खाल्ल्याने अनेकांना पोटाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावं लागतं. कधी वेळेवर नाष्टा न करणे तर कधी दुपारचे जेवण न करणे तर कधीतरी अगदी गरजेपेक्षा जास्त खाणे, यासारख्या गोष्टी आपल्यापैकी अनेकजण करतात. त्यामुळे पोटात बिघाड होतो आणि ज्यामुळे पोटातून आवाज येणे, गॅस तसेच अ‍ॅसिटीडीसारख्या समस्या होतात.

How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

अ‍ॅसिडिटी सारख्या समस्या टाळण्यासाठी काय केलं पाहीजे?

जेवणापूर्वी आल्याचा एक तुकडा घ्यावा त्यामध्ये लिबांच्या रसाचे दोन किंवा तीन थेंब व काळं मीठ किंवा साधे मीठ टाकूण मिश्रण तयार करावे. हे मिश्रण दातांच्या खाली ठेवून चावावे आणि पाणी प्यावे. यामुळे गॅस व अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो. तसेच हे रोज केल्याने आपल्याला या पासून बराच फायदा होतो.

आयुर्वेदात असे सांगितले आहे, की आल्यामध्ये भूक, पचनशक्ती वाढवण्याबरोबरच जिभेची चव वाढवण्याचे गुण असतात. आपल्याला मळमळ होत असेल किंवा उलटी सारखं होत असेल तर यासाठी आलं फायदेशीर ठरते. मीठामुळे पचनशक्ती चांगली ठेवण्यास मदत होते. शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यास देखील मीठाच्या सेवनाने फायदा होतो.

आयुर्वेदात असे सांगितले आहे की, पचनसंस्था ही योग्य प्रकारे काम करत नसेल तर पोटात अनेक प्रकराचे घातक पदार्थ तयार होतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते. तसेच रक्त वाहिन्यानमध्ये अडथळा निर्माण होऊन रक्तप्रवाहावर परिणाम होतो. आलं खाल्यामुळे पोटाच्या अनेक विकारांपासून सुटका मिळण्याबरोबरच भविष्यात होणारे कोलेस्ट्रॉल वाढण्यासारख्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येते.

अ‍ॅसिडिटी सारख्या समस्यासाठी परस्पर गोळ्या औषध घेणं टाळा. अधिक त्रास होत असेल तर फॅमेली डॉक्टराचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते.