News Flash

अ‍ॅसिडिटीची औषधे मूत्रपिंडाला बाधक

पीपीआयएसचा योग्य वापर न केल्यास ते आरोग्याला घातक असल्याचे दिसून आले आहे.

| January 15, 2016 03:20 am

वॉशिंग्टनच्या संशोधकांचा दावा

अ‍ॅसिडिटी झाल्यामुळे  छातीत होणारी जळजळ शमवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध औषधांचा वापर अनेकजण करत असतात. पण त्यामुळे मूत्रपिंडाचा आजार बळावण्याची अधिक शक्यता आहे, असे वॉशिंग्टनमधील शास्त्रज्ञांनी सांगितले.

अमेरिकेतील डॉक्टर अ‍ॅसिडिटी झालेल्या रुग्णाला सर्वसाधारणपणे प्रोटॉन पंप इनहॅबिटर्स(पीपीआयएस) हे औषध घेण्याचा सल्ला देतात. जवळपास ७० टक्के  रुग्ण हा सल्ला अमलात आणतात. पण त्यापैकी जवळपास २५ टक्के  लोकांमध्ये मात्र या औषधाचे सेवन कशा प्रकारे करावे याविषयीचे अज्ञान दिसून आले आहे. पीपीआयएसचा योग्य वापर न केल्यास ते आरोग्याला घातक असल्याचे दिसून आले आहे. पण संशोधकांनी मात्र असा कोणताही दावा केलेला नाही, कारण लोकसंख्येवर आधारित असा कोणताही अभ्यास अद्याप केला गेलेला नाही. ज्यात पीपीआयचा वापर व दीर्घकालीन किडनींचा आजार (सीकेडी) यांच्यातील साधम्र्य तपासण्यात आले आहे.

अमेरिकेच्या जोहान्स होपकिन्स विद्यापीठाचे आणि सहअभ्यासक मार्गन ई ग्राम्स यांनी अ‍ॅथेरोस्केलरसीस रिस्क इन कम्युनिटिज्(एआरआयसी)कडून सर्वसाधारण लोकसंख्येतील संकलित माहितीतून स्वत: पीपीआयचा वापर करणारे (१० हजार ४८२ सहभागी लोकांवर जवळपास १४ वर्षे) आणि जेसिंगर हेल्थ सिस्टम इन पेनसलेविनाने सल्ल्यानुसार पीपीआयचे सेवन करणाऱ्यांचा (२४ लाख ८ हजार ७५१ यांचा सहा वर्षे) अभ्यास केला. याच सर्वेक्षणाच्या आधारावर दोन्ही गटांतील पीपीआयचा वापर करणाऱ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात उच्च रक्तदाब शमवण्यासाठी, वेदनाशामक औषधे आणि स्टैटिन औषधांचे सेवन करत असल्याचे दिसून आले आहे.

एआरआयसी गटातील पीपीआय वापरकर्त्यांच्या ३२२ जणांपैकी ५६ लोकांना मूत्रपिंड आजाराची लक्षणे आढळून आली (वर्षांतील १ हजार लोकांमागे १४.२ टक्के प्रमाण) आणि सेवन न करणाऱ्या १० हजार १६० लोकांमागे हे प्रमाण १ हजार ३८२ (वर्षांतील १ हजार लोकांमागे १०.७ टक्के) असे प्रमाण दिसून आले. पीपीआयच्या अतिरिक्त वापरामुळे सीकेडी हा मूत्रपिंडाचा आजार होण्याची शक्यता आहे. पीपीआयचे सेवन करणाऱ्या ३२२ लोकांना पुढील १० वर्षांत मूत्रपिंडाच्या आजाराची शक्यता ११.८ टक्के  असल्याचे आढळून आली़, तर पीपीआयचे सेवन न करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण केवळ ८.५ टक्के  असल्याचे दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2016 3:20 am

Web Title: acidity drugs cons for kidney
टॅग : Kidney
Next Stories
1 अन्नसंरक्षक रसायनांनी कर्करोग पेशी मारण्यात मदत
2 अतिरिक्त व्यायामामुळे काचबिंदू बळावण्याची शक्यता
3 डीव्हीडीमार्फत व्यायामाचे मार्गदर्शन घातक
Just Now!
X