एरोबिक व्यायामाने वयपरत्वे बिघडणारे मेंदूचे कार्य सुधारते, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सटिीच्या वैज्ञानिकांनी काही व्यक्तींवर प्रयोग केल्यानंतर म्हटले आहे, की एरोबिक व्यायामाने मेंदूतील हिप्पो कॅम्पसवर काय परिणाम होतो याचा अभ्यास यात करण्यात आला.

मेंदूचे आरोग्य वयानुसार खराब होत असते. वयाच्या चाळिशीनंतर मेंदूचा आकार पाच टक्क्यांनी आक्रसतो. संशोधकांनी एकूण ७३७ जणांच्या मेंदूचा एमआरआय प्रतिमांच्या मदतीने अभ्यास केला, त्यात एरोबिक व्यायामापूर्वी व नंतर काढलेल्या प्रतिमांमध्ये फरक दिसून आला.

Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Menopause & Perimenopause
मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजचा शरीरावर कसा परिणाम होतो? महिलांनी स्वत:ची कशी काळजी घ्यावी?
Solar rooftop electricity connection
सरकारने नियम बदलले, आता सौर पॅनल अन् वीज जोडणी तात्काळ मिळणार
Prayas Energy Groups work is primarily in the context of energy and power sector policies and consumer interest
वर्धानपनदिन विशेष : ऊर्जा, आरोग्यासाठी ‘प्रयास’

२४ ते ७६ वयोगटातील सुदृढ व अल्झायमर, नराश्य स्किझोफ्रेनिया हे रोग झालेल्या लोकांचा तुलनात्मक अभ्यास या मेंदू प्रतिमांच्या मदतीने करण्यात आला.

स्थिर सायकल चालवणे, चालणे यांसारख्या एरोबिक व्यायामामुळे रुग्णांमध्ये ३ ते २४ महिन्यांत फरक दिसून आला.

एरोबिक व्यायामामुळे ‘ब्रेन डिराइव्हड न्यूरोट्रफिक फॅक्टर’ या रसायनाची निर्मिती होऊन मेंदूचा ऱ्हास कमी होतो, असे न्यूरोइमेज या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे. एरोबिक व्यायामाने हिप्पोकॅम्पसचा आक्रसलेला आकार वाढून मेंदूची हानी रोखली जाते.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिसिन या संस्थेचे जोसेफ फिर्थ यांनी सांगितले, की बीडीएनएफ (‘ब्रेन डिराइव्हड न्यूरोट्रफिक फॅक्टर’) रसायनाने मेंदूच्या हिप्पोकॅम्पसचा डावा भाग सुधारतो, त्यामुळे मेंदूची झालेली हानी काही प्रमाणात भरून येते.