News Flash

14 वर्षांचा प्रवास संपला? Hero च्या लोकप्रिय Scooty चं प्रोडक्शन बंद

लॉचिंगनंतर अल्पावधीतच ही Scooty महिलांमध्ये कमालीची लोकप्रिय ठरली होती...

हीरो मोटोकॉर्पने Hero Pleasure ही भारतातील आपली सर्वाधिक लोकप्रिय Scooty बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. कंपनीने या Scooty चं प्रोडक्शन थांबवलं असून डिलर्सकडूनही या Scooty साठी बुकिंग घेतले जात नसल्याची माहिती आहे. कंपनीने ही Scooty आपल्या वेबसाइटवरुनही हटवली आहे, त्यामुळे या Scooty चा  भारतीय रस्त्यांवरील 14 वर्षांचा प्रवास संपला असे मानले जात आहे.

फर्स्ट-जनरेशन प्लेजर स्कूटरची जागा घेण्यासाठी कंपनीने गेल्या वर्षीच Pleasure Plus ही नवीन Scooty बाजारात आणली आहे. फर्स्ट-जनरेशन Pleasure स्कूटर 2006 मध्ये Hero Honda सोबतच्या भागीदारीअंतर्गत Hero Honda Pleasure नावाने लाँच झाली होती. लॉचिंगनंतर अल्पावधीतच ही Scooty महिलांमध्ये कमालीची लोकप्रिय ठरली होती. मार्केटमधील त्यावेळेच्या टीव्हीएस स्कूटी पेप, कायनॅटिक जिंग आणि बजाज स्पिरिटी यांसारख्या स्कूटर्सपेक्षा एक पाऊल पुढे होती. अन्य स्कूटर्समध्ये जवळपास 80cc क्षमतेचं इंजिन होतं, तर प्लेजरमध्ये 102cc क्षमतेचं इंजिन देण्यात आलं होतं.

पण, आता बाजारात 110cc क्षमतेच्या स्कूटरची क्रेझ वाढली. 102cc इंजिन क्षमतेपेक्षा 110cc क्षमतेच्या स्कूटर घेण्याला ग्राहक प्राधान्य देत असल्याने गेल्या काही वर्षांपासून Hero Pleasure ची मागणी कमी झाली होती, ग्राहकांच्या कमी प्रतिसामामुळे कंपनीने प्रोडक्शनही घटवले होते. त्यानंतर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनीने गेल्या वर्षी 110cc क्षमतेची Pleasure Plus ही नवीन Scooty बाजारात आणली आहे. नव्या स्कूटरची किंमत जवळपास जुन्या स्कूटरइतकीच असल्याने आता Hero Pleasure चा भारतीय रस्त्यांवरील 14 वर्षांचा प्रवास संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 10:40 am

Web Title: after 14 year long innings hero pleasure discontinued in india sas 89
Next Stories
1 ट्रिपल कॅमेऱ्यासह ‘जंबो’ बॅटरी, ‘बजेट’ स्मार्टफोन Samsung Galaxy M21 झाला लाँच
2 सहा कॅमेऱ्यांच्या शानदार स्मार्टफोनसाठी ‘खास सेल’, मिळेल भरघोस डिस्काउंटही
3 Apple कडून सर्वात स्वस्त MacBook लाँच, सर्वात पॉवरफुल iPad ही आणला
Just Now!
X