19 January 2021

News Flash

अ‍ॅन्जिओप्लास्टी झाल्यानंतर पुढे काय?

अ‍ॅन्जिओप्लास्टी केल्यानंतर काय काळजी घ्यायची

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याला शनिवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शनिवारी संध्याकाळी सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. अ‍ॅन्जिओप्लास्टी केल्यानंतर काय काळजी घ्यायची असते याबद्दल आपल्याला माहीत असलंच पाहिजे. जाणून घेऊयात नेमकी काय काळजी घ्यायला हवी…

* अ‍ॅन्जिओप्लास्टीनंतर दोन दिवसांत रुग्णालयातून सुट्टी देण्यात येते. दोन-चार दिवस घरीच आराम केल्यानंतर अशा रुग्णाने आपल्या जीवनशैलीबद्दल विचार करावा आणि हृदयविकार का झाला, त्याची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. जी काही धोक्याची घटके (Risk Factors) आहेत त्यांना कमी करण्याचा प्रयत्न सुरू करावा.

* दररोज सकाळी योग्य असा व्यायाम करावा. या व्यायामाचे स्वरूप हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरकडून आखून घ्यावे. डॉक्टर रुग्णाच्या वयाप्रमाणे, वजनाप्रमाणे आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवरून त्याच्या व्यायामाचे स्वरूप ठरवतात. सकाळी उठून वेगाने चालण्याचा व्यायाम हा सर्व वयाच्या लोकांसाठी चांगला आहे.

* आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करावा. वजन कमी करावे आणि कमरेचा घेर कमी करावा. यासाठी आहारात योग्य तो बदल करावा त्यासाठी हृदयरोगतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ यांची मदत घ्यावी. भरपूर फळे व भाज्या खाव्यात आणि आहारात कमी कॅलरीचे आणि कमी तेल-तुपाच्या पदार्थाचा समावेश करावा. कडधान्ये, कोंडय़ा-टरफलासह धान्य, डाळी खाव्यात. मासे, चरबीविरहित मांस थोडे आणि कधी कधी खाण्यास हरकत नाही. हिरव्या पालेभाज्या, लसूण, कांदा, काकडी, टोमॅटो, मुळा, बीट, गाजर यांचा भरपूर वापर जेवणात असावा.

* छंद जोपासा, खेळा, तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. आनंदी राहा. मानसिक शांतता व स्थैर्य याचा हृदयरोग्यांना उत्तम फायदा होतो. त्यासाठी ध्यानधारणा, योगा या गोष्टींचा उपयोग करावा.

*शांत झोप शरीराला आवश्यक असते म्हणून रात्री ७ ते ८ तास छान झोप घ्यावी.

* धूम्रपान टाळा, तंबाखूचे सेवन बंद करा. मद्यपान टाळा, फास्ट फूड टाळा, चायनीज फूड टाळा.

* जेवणात मिठाचे प्रमाण कमी करावे, मसाल्यांच्या पदार्थाचा वापर कमी करावा.

* संताप, चिडचिड, वैताग, मत्सर, द्वेष, निराशा यांना सोबत बाळगू नका. सामाजिक असहिष्णुता व एकाकी राहणे टाळा. आनंदी राहा. समाधानी राहा.

* मधुमेह नियंत्रणात ठेवावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 12:43 pm

Web Title: after angioplasty what happens during angioplasty nck 90
Next Stories
1 IndiGo चा खुलासा, डिसेंबरमध्ये हॅक झालं होतं सर्व्हर; डॉक्युमेंट्स चोरल्याची भीती
2 तुम्हीही UPI द्वारे पेमेंट करतात का? NPCI ने दिली ‘गुड न्यूज’
3 IRCTC New Website: एका मिनिटात बूक होणार 10,000 तिकीटं; एकाच वेळी 5 लाख युजर्स करु शकणार Login
Just Now!
X