09 August 2020

News Flash

टिकटॉकला पर्याय : आता इंस्टाग्रामने भारतात लाँच केलं Reels

टिकटॉकप्रमाणे 15 सेकंदाचा व्हिडिओ बनवता येणारं इंस्टाग्रामचं Reels ...

इंस्टाग्रामने भारतात नवीन शॉर्ट व्हिडिओ फीचर रील्स (Reels) लाँच केलं आहे. Instagram च्या या नव्या सर्व्हिसमध्ये टिकटॉकप्रमाणे अनेक फीचर्स मिळतील. याद्वारे युजर्स अॅपवर व्हिडिओ बनवू शकतात, क्रिएटिव्ह फिल्टर आणि म्युजिक अॅड करुन शेअर करु शकतात. यामध्ये टिकटॉकप्रमाणे लोकप्रिय गाणे, ट्रेंड किंवा चॅलेंजसह 15 सेकंदाचा व्हिडिओ बनवता येतो.

इंस्टाग्रामच्या रील्स फीचरद्वारे युजर्स टिकटॉकप्रमाणे 15 सेकंदाचा व्हिडिओ बनवू शकतात. यासाठी म्युजिक लाइब्रेरीमधून ऑडियो, स्पीड, इफेक्टस आणि टाइमरचे ऑप्शन उपलब्ध आहेत. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये बदल करु शकतात किंवा व्हिडिओचा स्पीडही कंट्रोल करता येतो. व्हिडिओ बनवल्यानंतर युजर्स आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर करु शकतात. इंस्टाग्रामचं हे फीचर अॅपमध्येच आहे, त्यामुळे यासाठी नवीन अॅप डाउनलोड करावं लागत नाही.

जगातील काही देशांमध्ये हे फीचर आधीपासूनच उपलब्ध होतं आता कंपनीने हे फीचर भारतीय युजर्ससाठीही आणलं आहे. टिकटॉक बॅन झाल्यानंतर अनेक अन्य अॅप्स लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे इंस्टाग्रामच्या रील्स फीचरलाही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 10:25 am

Web Title: after ban on tiktok instagram launches new short video feature reels get details sas 89
Next Stories
1 काळे वाटाणे खाण्याचे असेही गुणकारी फायदे
2 Monsoon Recipe : घरच्या घरी बनवा खमंग, चटकदार पोह्यांची कचोरी
3 पावसाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी
Just Now!
X