News Flash

‘टोयोटा’ने परत मागवल्या 6 हजारांहून जास्त कार, कंपनीकडून गाड्या ‘रिकॉल’ केल्याची घोषणा

एक दिवसापूर्वीच मारुती सुझुकीनेही 1 लाख 34 हजाराहून जास्त कार परत मागवल्या आहेत...

‘टोयोटा’ने परत मागवल्या 6 हजारांहून जास्त कार, कंपनीकडून गाड्या ‘रिकॉल’ केल्याची घोषणा
(File Pic- Reuters)

टोयोटा किर्लोस्कर मोटरने (TKM)बुधवारी आपली प्रीमियम हॅचबॅक Glanza च्या 6,500 गाड्या परत मागवल्या आहेत. फ्युअल पंपमध्ये दोष असल्यामुळे कंपनीने या गाड्या ‘रिकॉल’ करत असल्याचं बुधवारी जाहीर केलं.

रिकॉल करण्यात आलेल्या सर्व ग्लांझा कार 2 एप्रिल 2019 ते 6 ऑक्टोबर 2019 दरम्यान मॅन्युफॅक्चर झाल्या आहेत. कंपनीच्या अधिकृत डिलरशिपमध्ये तपासणी केल्यानंतर सदोष फ्युअल पंप रिप्लेस केला जाईल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. दोष असलेल्या कारमालकांशी कंपनीचे डिलर्स संपर्क करतील. तसेच, सदोष पार्टची तपासणी आणि त्याला रिप्लेस देखील डिलर्सच करतील असे कंपनीकडून सांगण्यात आले.

(टोयोटाच्या ‘इनोव्हा’ला देणार तगडी टक्कर, लाँच झाली शानदार MG Hector Plus)

(प्रतीक्षा संपली! Honda City नेक्स्ट जनरेशन झाली लाँच)

टोयोटाच्या या कारचं वैशिष्ट्य म्हणजे टोयोटा आणि मारुती सुझुकी यांनी संयुक्त करारानुसार निर्मिती केलेली ही पहिलीच कार आहे. मारूती सुझुकीच्या ‘बलेनो’ या लोकप्रिय मॉडेलनुसार ‘ग्लांझा’चे डिझाइन करण्यात आले आहे. यातील बहुतांश फीचर्स हे बलेनोसारखेच आहेत. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच मारुती सुझूकीनेही आपल्या एकूण 1 लाख 34 हजार 885 कार परत मागवल्या आहेत. कंपनीने ‘रिकॉल’ केलेल्या सर्व वॅगनआर आणि बलेनो कार आहेत. या गाड्यांच्याही फ्युअल पंपमध्ये (fuel pump) दोष असल्यामुळे गाड्या ‘रिकॉल’ करण्यात आल्या आहेत.

(छोट्या फॅमिलीसाठी बेस्ट ऑप्शन आहे ‘ही’ देशातील सर्वात स्वस्त कार! किंमत फक्त….)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 12:42 pm

Web Title: after maruti suzuki now toyota recalls 6500 units of glanza to replace faulty fuel pumps sas 89
Next Stories
1 आयव्हीएफ प्रक्रियेविषयीचे गैरसमज करा दूर!
2 बजाज Avenger च्या किंमतीत बदल, जाणून घ्या नवीन किंमत
3 रिलायन्सने लाँच केली Jio Glass ची सेवा; डिजीटल शिक्षणासाठी होणार फायदा
Just Now!
X