News Flash

महाग झाला ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन Micromax In Note 1, कंपनीने वाढवली किंमत

Redmi Note 10 नंतर Micromax In Note 1 देखील झाला महाग

माइक्रोमॅक्स कंपनीचा गेल्या वर्षी लाँच झालेला बजेट स्मार्टफोन Micromax In Note 1 आता महाग झाला आहे. क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच शाओमी कंपनीनेही आपल्या Redmi Note 10 स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली होती. त्यानंतर आता Micromax In Note 1 देखील महाग झाला आहे.

स्पेसिफिकेशन्स :-
Micromax In Note 1 हा फोन व्हाइट आणि ग्रीन अशा दोन कलरच्या पर्यायात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असून हा फोन अंड्रॉइड 10 वर कार्यरत असेल. डिस्प्लेची डिझाइन पंचहोल असून त्यात सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये मीडियाटेक हीलियोG85 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 64/128 जीबी स्टोरेज आहे. फोनमध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. त्यातील ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, 2 मेगापिक्सलचा मायक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. 16 मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेराही. याशिवाय फोनमध्ये 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही दिली आहे.

किंमत :-
किंमतीत 500 रुपयांची वाढ झाल्याने आता Micromax In Note 1 फोनच्या बेसिक अर्थात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11 हजार 499 रुपये झाली आहे. तर, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंट मॉडेलच्या किंमतीत कंपनीने वाढ केलेली नाही. त्यामुळे या मॉडेलसाठी तुम्हाला आधीप्रमाणेच 12 हजार 499 रुपये मोजावे लागतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 4:21 pm

Web Title: after redmi note 10 now micromax in note 1 gets a price hike in india check new price and other details sas 89
Next Stories
1 मध्यरात्रीपासून Samsung Galaxy M42 5G ची विक्री सुरू, ‘मिडरेंज’ 5G स्मार्टफोनमध्ये शानदार फिचर्स
2 2,500 रुपयांनी स्वस्त झाला 5000mAh बॅटरीचा शानदार Oppo A53, जाणून घ्या डिटेल्स
3 सर्वात स्वस्त Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसरचा स्मार्टफोन Moto G40 Fusion, आज पहिलाच ‘सेल’
Just Now!
X