07 July 2020

News Flash

आक्रमक दृष्टिकोन रक्तदाब नियंत्रणासाठी किफायतशीर

या संशोधनामुळे एकटय़ा अमेरिकेतील १६.८ दक्षलक्ष लोकांना फायदा होण्याचा संशोधकांचा दावा आहे.

रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठीचा आक्रमक दृष्टिकोन किफायतशीर असल्याचा निष्कर्ष बुधवारी अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनातून पुढे आला आहे.

वयाची पन्नाशी गाठलेल्यामध्ये रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठीचा आक्रमक दृष्टिकोन किफायतशीर असल्याचा निष्कर्ष बुधवारी अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनातून पुढे आला आहे. बुधवारी हा अहवाल न्यू इंग्लंड जनरल ऑफ मेडिसीनकडून प्रदर्शित करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात संशोधनातील सकारात्मक निष्कर्षांमुळे प्रायोजक असणाऱ्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थकडून अभ्यास प्रकल्प थांबविण्यात आला होता.
या संशोधनामुळे एकटय़ा अमेरिकेतील १६.८ दक्षलक्ष लोकांना फायदा होण्याचा संशोधकांचा दावा आहे. या संशोधनातून जगभरात उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णावर कशा प्रकारे या देशात उपचार केला जातो हा संदेश जाणार आहे. याचबरोबर हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित विकारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यातही यश मिळणार असल्याचे मत अहवालाचे प्रमुख आणि अल्बामा विद्यापीठाच्या रोगपरिस्थितिविज्ञानचे प्राध्यापक पॉल मॉन्टेनर यांनी व्यक्त केले आहे.
अहवालात नमूद करण्यात आलेले निष्कर्ष अभ्यासकांना अचंबित करणारे असून निदेर्शित उपचार पद्धतीमुळे धोक्याचे प्रमाण कमी असल्याचे मत सहसंशोधक आणि उटाह हेल्थ केअरचे नेफ्रॉलॉजी आणि उच्चरक्तदाब विषयाचे प्रमुख आल्फ्रेड चेऊंग यांनी व्यक्त केले. याचबरोबर अहवालातील निष्कर्षांवर पुढील काळातही संशोधन करून उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णाच्या आक्रमक दृष्टिकोनाच्या उपचार पद्धतीतून होणाऱ्या दूरगामी परिणामांवरदेखील संशोधनाची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
सध्याच्या जीवनशैलीमध्ये औषधाचा वापर करताना उच्च रक्त दाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी केली जाणारी उपचारपद्धतीमुळे, किडनी तसेच रक्तदाब कमी करण्यावरही विपरीत परिणाम संभावतो. या संशोधनातून अभ्यास करताना मेंदू आणि किडनीशी निगडित आजारांविषयीचे आकलन केले जात आहे.
रुग्णामधील हृदयस्नायूच्या आकुंचनासंबंधीच्या अभ्यासावर लक्ष टाकले असता अतिउच्चदाबासंबंधी दोन प्रकारे निदान करण्यात येते. त्यानुसार जर १२० एमएम एचजीपेक्षा कमी रक्तदाब असल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बळावते तर दुसरीकडे हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता २४ टक्के आल्यावर, मृत्यू होण्याची टक्केवारी २७ टक्के असल्याचे समोर आले आहे. संशोधनात ९,३०० लोकांचा सहभाग असून त्यांचा रक्तदाब साधारण १२० एमएम एच जी आणि जास्तीत जास्त १४० एमएम एच जीमध्ये असल्याचे गृहीत धरण्यात आले आहे, तसेच वयाची पन्नाशी गाठलेल्या आणि ज्यांना रक्तदाब १३० एमएम एच असून उच्च रक्तदाबाच्या विकाराची लक्षणेदेखील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2015 1:46 am

Web Title: aggressive approach advantageous for of control blood pressure
टॅग Blood Pressure
Next Stories
1 मधुमेही जखमांवर जलदगती उपचारासाठी नवे औषध
2 आयुष्यमान ओळखणारे उपकरण विकसित
3 ‘हेपॅटिटिस बी’ निदानासाठी १ डॉलरची निदान चाचणी
Just Now!
X