तुमचा विमान प्रवास आता आणखी महाग होणार आहे. कारण, नागरी उड्डाण मंत्रालयाने उड्डाण सुरक्षा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  1 जुलैपासून उड्डाण सुरक्षा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे विमान प्रवास काही प्रमाणात महागणार आहे. परदेशी प्रवाशांबरोबरच देशांतर्गत प्रवाशांनाही या शुल्कवाढीचा फटका बसणार आहे. विमान प्रवाशांकडून प्रवासी सेवा शुल्काऐवजी उड्डाण सुरक्षा शुल्काची आकारणी केली जाणार आहे.

हवाई सुरक्षा शुल्कात १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आला आहे. हे शुल्क १३० रुपयांवरून १५० रुपयांवर गेल्यामुळे विमान प्रवास आता आणखी महाग होणार आहे, अशी माहिती एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.  तर परदेशी प्रवाशांना 3.25 डॉलर्सऐवजी 4.85 डॉलर्सचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. यासंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाने शुक्रवारी आदेश जारी केला. हवाई सुरक्षा शुल्काचे हे दर १ जुलै २०१९ रोजी १२ वाजून एक मिनिटांनी लागू होतील .