– डॉ. भरेश देढिया

हवेतून संक्रमित होणारा आजार म्हणजे नेमके काय?संसर्ग झालेले रुग्ण हवेमध्ये ड्रॉप्लेट न्युक्लिआय सोडतात व त्यामुळे जे आजार होतात त्यांना हवेतून संक्रमित होणारे आजार म्हणतात. ड्रॉप्लेट न्युक्लिआय म्हणजे रेस्पिरेटरी सिक्रेशन्समधले कण असतात आणि त्यांचा व्यास 5 मायक्रॉनपेक्षाही कमी असतो. हे ड्रॉप्लेट न्युक्लिआय हवेमध्ये काही मिनिटे ते काही तास जिवंत राहतात आणि त्यामुळे अशा रुग्णांच्या संपर्कात किंवा आजूबाजूला येणाऱ्या व्यक्तींच्या श्वसनावाटे ते संक्रमित होऊ शकतात. पल्मोनरी ट्युबरक्युलॉसिस (टीबी), गोवर, कांजण्या, व्हॅरिसेला, सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) विषाणू यांचा संसर्ग झालेल्या रुग्णांमुळे हवेतून विषाणूचे संक्रमण होऊ शकते, हे आपल्याला माहीत आहे. कोविड-19 विषाणू (SARS-CoV2) हवेतून संक्रमित होऊ शकतो का, याविषयी अलीकडेच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोविड-19 होण्यास कारणीभूत असणारा कोरोनोव्हायरस हवेमध्ये किती वेळ जिवंत राहू शकतो

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
Summer heat
Health Special : उन्हाळ्याची झळ लागू लागली; काय काळजी घ्याल?

नैसर्गिक स्थितीमध्ये, SARS-CoV2 किती प्रमाणात हवेतून संक्रमित होऊ शकतो आणि सध्याची महामारी विचारात घेता या विषाणूचा संसर्ग हवेमुळे किती झाला आहे, हा वादाचा मुद्दा आहे. प्रायोगिक तत्त्वावर तयार केलेल्या एअरोसोलमध्ये हा विषाणू किमान 3 तासांपर्यंत जिवंत राहू शकतो, असे एक अभ्यास दर्शवतो. याचा अर्थ, विषाणूचे कण असणाऱ्या हवेच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली तर तिने श्वसन केल्यावर त्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. ती व्यक्ती त्या परिसरामध्ये आलेली नसली तरीही संसर्ग होऊ शकतो. SARS-CoV2 चे हवेतून दीर्घ टप्प्यामध्ये संक्रमण होत असल्याचा सुस्पष्ट निष्कर्ष अद्याप नोंदवण्यात आलेला नाही. परंतु, एअरोसोल निर्माण करण्याची प्रक्रिया केली जात असलेल्या, किंवा शिंकणाऱ्या आणि/किंवा खोकणाऱ्या रुग्णाच्या संपर्कात आल्यास मात्र हवेतून संसर्ग होण्याची शक्यता मोठी असते.

हवेतून संक्रमित होणाऱ्या सूक्ष्म जंतूंनी शरीरात प्रवेश केला तर काय घडते?
विषाणू अस्तित्वात असलेल्या, हवेतील ड्रॉप्लेट कणांमध्ये एखाद्या व्यक्तीने श्वसन केल्यास विषाणू त्या व्यक्तीच्या नाकातील, तोंडातील किंवा गळ्यातील मुकोस मेम्ब्रन्सच्या थेट संपर्कात येतो आणि त्या व्यक्तीच्या पेशींमध्ये मिसळून जातो. हा विषाणू वाढण्यास आणि पसरण्यास सुरुवात होते. त्याचा प्रसार फुप्फुसात किंवा अन्य अवयवांमध्ये होऊ शकतो. यामुळे निरनिराळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे कोणत्या अवयवांपर्यंत विषाणू पोहोचला आहे, यावर अवलंबून असतात.

हवेतून संक्रमित होणाऱ्या आजारांपासून सुरक्षित राहण्याच्या व काळजी घेण्याच्या टिप्स:
सर्वांनी घेण्याची सर्वसाधारण काळजी म्हणजे, हाताची स्वच्छता राखणे, रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी, तसेच सर्वसामान्य लोकांनीही मास्क घालणे, जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा किमान 6 फुटांचे सोशल डिस्टन्सिंग पाळणे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासादरम्यान बराच वेळ लोकांशी जवळून संवाद साधू नये. पुरेसा वारा खेळता नसलेल्या बंदिस्त ठिकाणी जाणे टाळावे आणि पुरेसा वारा खेळता असलेल्या खुल्या ठिकाणांना प्राधान्य द्यावे. संसर्ग झालेल्या व्यक्तींची काळजी घेत असताना PPE सुट घालणे आणि N-95 मास्क घालणे अशी काळजी घेतल्यास तुम्ही सुरक्षित राहू शकाल.

(लेखक खार येथील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट ऑफ क्रिटिकल केअर हेड आहेत)