रिलायंस जिओच्या 4G हॉटस्पॉट डिव्हाइसला टक्कर देण्यासाठी Airtel ने एक ऑफर आणली आहे. एअरटेलकडून 4G हॉटस्पॉट वाय-फाय डिव्हाइसच्या खरेदीवर खास सवलत दिली जात आहे.

सद्यस्थितीला भारतीय बाजारात 4G हॉटस्पॉट वाय-फाय सेवा पुरवणाऱ्यांमध्ये एअरटेल आणि रिलायंस जिओ या मुख्य कंपन्या आहेत. त्यामुळे या नव्या सेवेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या नवनवे प्रयत्न करत आहेत.

एअरटेल 4G हॉटस्पॉट कॅशबॅक ऑफर –
सुरूवातीला एअरटेल 4G हॉटस्पॉटची किंमत 999 रुपये होती. त्यानंतर कंपनीने याची किंमत वाढवून 2 हजार केलीये. डिव्हाइस खरेदी केल्यानंतर युजर्सना 399 किंवा 499 रुपयांचं रिचार्ज करणं आवश्यक आहे. यानंतर डिव्हाइस सक्रिय (अॅक्टिवेशन) करण्यासाठी 300 रुपये अतिरिक्त द्यावे लागतात. एकदा अॅक्टिवेशन पूर्ण झाल्यानंतर युजर्सना 1 हजार रुपये कॅशबॅक मिळतात. युजर्सच्या पोस्टपेड अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतील आणि याचा वापर एअरटेलचं बिल भरण्यासाठी करता येऊ शकतो.

एअरटेल 4G रिचार्ज प्लान –
एयरटेलने काही दिवसांपूर्वीच आपल्या 4G हॉटस्पॉट डिव्हाईसच्या किंमतीत बदल केला होता. 399 रुपयांच्या 4G हॉटस्पॉट रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना एका महिन्यासाठी 50जीबी डेटा आणि 1,000 रुपये कॅशबॅकची ऑफर आहे. 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये एका महिन्यासाठी युजर्सना 75जीबी डेटा आणि 1,000 रुपये कॅशबॅकची ऑफर आहे. यातील वैशिष्ट्य म्हणजे जर कंपनीकडून मिळणारा इंटरनेट डेटा महिन्याभरात संपला नाही तर उरलेला डेटा पुढील महिन्यासाठी आपोआप वापरता येतो. एअरटेल हॉटस्पॉटद्वारे एकाच वेळी 10 उपकरणं कनेक्ट करता येणं शक्य आहे. यात 1,500mAh क्षमतेची बॅटरी असल्याने वारंवार चार्जिंग करण्याची आवश्यकता भासत नाही. दुसरीकडे, रिलायंस जिओ-फाय 3G नेटवर्कशी कनेक्ट करता येत नाही पण एअरटेलचं 4G वाय-फाय हॉटस्पॉट 3G आणि 4G नेटवर्कवर स्विच करता येतं.