टेलिकॉम कंपनी एअरटेलकडून परदेशात प्रवास करणाऱ्या आणि रोमिंगला वैतागलेल्या ग्राहाकांना दिलासा मिळाला आहे. कंपनीने आपल्या आंतरराष्ट्रीय रोमिंग सर्व्हिससाठी ‘रिअल टाइम ट्रॅकिंग’ आणि ‘रोमिंग प्लॅन प्री-बुकिंग’ यांसारखे फीचर्स आणले असून ही सेवा आधीपेक्षा उत्तम केली आहे. यासोबतच कंपनीने तीन नवीन ‘ग्लोबल’ प्लॅन आणले आहेत.

रिअल-टाइम ट्रॅकिंग फीचरच्या मदतीने एअरटेल युजर्स आपल्या इंटरनॅशनल रोमिंग प्लॅनमधील किती डेटाचा वापर केलाय हे Airtel Thanks अॅपद्वारे चेक करु शकतात. ही सुविधा पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही ग्राहकांसाठी असेल. तसेच, एअरटेल प्रीपेड युजर्स आता प्रवासाच्या दिवसाच्या 30 दिवस आधी इंटरनॅशनल रोमिंग पॅक बुक करु शकतात. जेव्हा ग्राहक इंटरनॅशनल रोमिंग नेटवर्कमध्ये गेल्यानंतरच प्लॅनची वैधता सुरू होईल. हे फीचर केवळ पोस्टपेड ग्राहकांसाठीच आहे. ग्राहक इंटरनॅशनल रोमिंग सर्व्हिस Airtel Thanks अॅपद्वारेच सुरू किंवा बंदही करु शकतात. याशिवाय, भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी तीन नवीन ‘ग्लोबल’ प्लॅन आणले आहेत. रोमिंगवर तोडगा असलेले हे तिन्ही प्लॅन्स परदेशात फिरायला जाणाऱ्या एअरटेल ग्राहकांसाठी फायदेशीर असतील. एअरटेलने 799 रुपये, 1199 रुपये आणि 4999 रुपयांचे प्लॅन आणले आहेत. यातील पहिले दोन प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आहेत. तर, तिसरा प्लॅन प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी आहे. जाणून घेऊया एअरटेलने आणलेल्या तीन प्लॅन्सबाबत…

Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा
loksatta analysis midcap and smallcap stocks surged
विश्लेषण: सरत्या वर्षात शेअर बाजारात तेजीच तेजी… ‘स्मॉल कॅप’ ठरले छोटे उस्ताद! तेजीचे आणखी कोण भागीदार?
Kia adds two new automatic variants
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Kia ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे आणले २ नवे व्हेरिएंट, किंमत…
Viral Video Sister's dance on zingat song at brother's wedding girls stunning dance
Viral Video : भावाच्या लग्नात बहिणींचे झिंगाट नृत्य, तरुणींचा जबरदस्त डान्स एकदा बघाच

(1) 799 रुपये– या प्लॅनमध्ये भारत आणि ज्या देशात तुम्ही प्रवास करत आहात, त्यासाठी 100 मिनिट आणि 30 दिवसांसाठी अनलिमिटेड इनकमिंग SMS ची सुविधा मिळेल.

(2) 1199 रुपये– या नव्या प्लॅनमध्ये 1GB डेटासोबत भारत आणि ज्या देशात प्रवास करत आहात, तिथे 100 मिनिट मिळतील. याशिवाय 30 दिवसांसाठी अनलिमिटेड इनकमिंग SMS ची सुविधा आहे.

3) 4999 रुपये– या प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा, अनलिमिटेड इनकमिंग कॉल, भारत आणि अन्य देशासाठी 500 मिनिट आउटगोइंग कॉल आणि 10 दिवसांसाठी अनलिमिटेड इनकमिंग एसएमएसची सुविधा मिळेल. हा प्लॅन अद्याप लाँच झालेला नाही, मात्र थोड्याच दिवसांमध्ये कंपनी हा प्लॅन लाँच करणार आहे.