आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी तीन नवीन ‘ग्लोबल’ प्लॅन आणले आहेत. रोमिंगवर तोडगा असलेले हे तिन्ही प्लॅन्स परदेशात फिरायला जाणाऱ्या एअरटेल ग्राहकांसाठी फायदेशीर असतील. या प्लॅन्ससोबत कंपनीने आंतरराष्ट्रीय रोमिंगसाठी काही फीचर्सचीही घोषणा केली. परदेशात फिरायला जाणाऱ्यांना याचा फायदा होईल. Airtel Thanks अॅपचा वापर करुन पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही ग्राहक रिअल टाइम बेसिसवर आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅकचा किती वापर केलाय हे ट्रॅक करु शकतात.

एअरटेलने 799 रुपये, 1199 रुपये आणि 4999 रुपयांचे प्लॅन आणले आहेत. यातील पहिले दोन प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आहेत. तर तिसरा प्लॅन प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी आहे. जाणून घेऊया एअरटेलने आणलेल्या तीन प्लॅन्सबाबत…

(1) 799 रुपये– या प्लॅनमध्ये भारत आणि ज्या देशात तुम्ही प्रवास करत आहात, त्यासाठी 100 मिनिट आणि 30 दिवसांसाठी अनलिमिटेड इनकमिंग SMS ची सुविधा मिळेल.

(2) 1199 रुपये– या नव्या प्लॅनमध्ये 1GB डेटासोबत भारत आणि ज्या देशात प्रवास करत आहात, तिथे 100 मिनिट मिळतील. याशिवाय 30 दिवसांसाठी अनलिमिटेड इनकमिंग SMS ची सुविधा आहे.

3) 4999 रुपये– या प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा, अनलिमिटेड इनकमिंग कॉल, भारत आणि अन्य देशासाठी 500 मिनिट आउटगोइंग कॉल आणि 10 दिवसांसाठी अनलिमिटेड इनकमिंग एसएमएसची सुविधा मिळेल. हा प्लॅन अद्याप लाँच झालेला नाही, मात्र थोड्याच दिवसांमध्ये कंपनी हा प्लॅन लाँच करणार आहे.