आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी डबल डेटा ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार कंपनीच्या 98 रुपयांच्या अ‍ॅड-ऑन प्रीपेड रीचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दुप्पट डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना आता 28 दिवसांच्या वैधतेसह एकूण 12 जीबी हाय-स्पीड डेटा वापरण्यास मिळेल. आधी या प्लॅनमध्ये कंपनीकडून 6 जीबी हाय-स्पीड डेटा दिला जात होता.

एअरटेलच्या 98 रुपयांच्या अ‍ॅड-ऑन प्रीपेड रीचार्ज प्लॅनवर दुप्पट डेटाची ऑफर आहे. पण हा केवळ अ‍ॅड-ऑन रिचार्ज प्लॅन आहे. त्यामुळे यामध्ये केवळ डेटा वापरण्यास मिळेल. मोफत कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा ग्राहकांना मिळणार नाही. याशिवाय कंपनी आपल्या युजर्सना 500 रुपये, 1,000 रुपये आणि 5,000 रुपयांच्या रीचार्ज प्लॅनवर अतिरिक्त टॉकटाइम देत आहे.

आणखी वाचा- प्रत्येक कॉलवर कॅशबॅक, ‘या’ टेलिकॉम कंपनीनं दिली ऑफर

Airtel च्या 500 रुपयांच्या रिचार्जवर आतापर्यंत 423.73 रुपये टॉकटाइम मिळत होता. त्याऐवजी आता 480 रुपयांचा टॉकटाइम मिळेल. अशाचप्रकारे 1,000 रुपयांच्या रीचार्जवर 847.46 रुपयांच्या टॉकटाइमऐवजी आता 960 रुपयांचा टॉकटाइम व 5,000 रुपयांच्या रीचार्जवर 4237 रुपयांच्या टॉकटाइमऐवजी 4,800 रुपये टॉकटाइम मिळेल. दुसरीकडे कंपनीने 48 रुपयांच्या अ‍ॅड ऑन प्लॅनमध्ये काहीही बदल केलेला नाही. एअरटेलच्या 48 रुपयांच्या अॅड ऑन प्रीपेड प्लॅनमध्ये अद्यापही 28 दिवसांच्या वैधतेसह एकूण 3 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो.