03 March 2021

News Flash

एका वर्षापर्यंत ‘फ्री’मध्ये पाहा टीव्ही, Airtel ची भन्नाट ऑफर

काही निवडक ग्राहकांना फ्री मिळणार एका वर्षापर्यंत एक्स्ट्रिम प्रीमियम प्लॅन

एअरटेलने आपल्या युजर्ससाठी एक शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार कंपनी आपल्या निवडक एअरटेल डिजिटल टीव्हीच्या ग्राहकांना Xstream Premium प्लॅन एक वर्षापर्यंत मोफत देत आहे.

कंपनीकडून मेसेज पाठवून याद्वारे आपल्या निवडक ग्राहकांना माहिती दिली जात आहे. ट्विटरवर अनेक युजर्सनी अशाप्रकारचा मेसेज आल्याचे स्क्रीनशॉट शेअर केले असून कस्टमर सपोर्टने याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली आहे.

“एअरटेल एक्स्ट्रीम प्रीमियम प्लॅन तुमच्या अकाउंटवर 365 दिवसांसाठी सुरू झाला आहे. याद्वारे एअरटेल एक्स्ट्रीम स्मार्ट स्टिकवर 10,000 पेक्षा जास्त सिनेमे, टीव्ही शो आणि अन्य कॉन्टेंट पाहता येईल”, अशा आशयाचे मेसेज युजर्सना कंपनीकडून पाठवले जात आहेत. विशेष म्हणजे नॉन-एक्स्ट्रीम बॉक्स किंवा स्मार्ट स्टिक युजर्सनाही एअरटेल डिजिटल टीव्हीकडून अशाप्रकारचे मेसेज येत आहेत.

एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्स आणि नॉन एक्स्ट्रीम बॉक्स या दोन्ही युजर्सना अशाप्रकारचे मेसेज येत आहेत. पण, ही ऑफर केवळ एअरटेल एक्स्ट्रीम स्मार्ट स्टिक युजर्ससाठी आहे की सामान्य DTH ग्राहकांनाही याचा लाभ मिळेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कंपनीकडून अजून यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे ऑफरसाठी ग्राहकांची कशाप्रकारे निवड केली जात आहे हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 11:44 am

Web Title: airtel free annual xstream premium plan offer for selected dth subscribers sas 89
Next Stories
1 स्वस्त Honor 9S खरेदी करण्याची आज संधी, किंमत 7000 पेक्षा कमी
2 ‘या’ स्टार्टअपने ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप’ स्पर्धेत मारली बाजी, सरकारने केली निवड
3 स्वस्त झाला Samsung चा ‘बजेट’ स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षाही कमी
Just Now!
X