एअरटेलने आपल्या युजर्ससाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार युजर्सना प्रिपेड रिचार्ज प्लॅनवर 6 जीबीपर्यंत डेटा कुपन फ्रीमध्ये मिळेल. एअरटेलचे ‘Free Data Coupons’ मिळवण्यासाठी युजर्सना विशेष काही करावं लागत नाही, 219 रुपयांच्या बेसिक प्रिपेड रिचार्जसह अन्य रिचार्जवर फ्री कुपन मिळू शकतील. पण यासाठी कंपनीने एक अट ठेवली आहे.
या रिचार्जवर मिळेल ऑफर :-
एअरटेल युजर्सनी जर 28 दिवसांची वैधता असलेल्या 219, 249, 279, 289, 298, 349, 398 व 448 रुपयांच्या अनलिमिटेड प्रीपेड प्लॅनने रिचार्ज केलं तर त्यांना अतिरिक्त एक-एक जीबीचे दोन डेटा कुपन फ्री मिळतील. याशिवाय, युजरने जर 56 दिवसांची वैधता असलेल्या 399, 449, 558 आणि 599 रुपयांच्या प्रिपेड प्लॅनने रिचार्ज केल्यास त्यांना एक-एक जीबीचे चार कुपन डेटा फ्री मिळतील, म्हणजे एकूण चार जीबी डेटा त्यांना फ्री मिळेल. तसेच, 84 दिवस वैधता असलेल्या 598 आणि 698 रुपयांच्या प्लॅनच्या रिचार्जवर एक-एक जीबीचे 6 डेटा कुपन फ्री मिळतील.
अट काय?
रिचार्ज केल्यानंतर युजरच्या अकाउंटमध्ये डेटा कुपन क्रेडिट होतील. पण या ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्सना Airtel Thanks मोबाइल अॅपद्वारे प्रिपेड रिचार्ज करणं गरजेचं असणार आहे. यासाठी युजर्स एअरटेल थँक्स अॅप डाउनलोड करु शकतात. या अॅपच्या My Coupons सेक्शनमध्ये जाऊन युजर डेटा कुपन रिडीम करु शकतात. यामध्ये युजर्सना कुपनच्या वैधतेबाबतही माहिती मिळेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2021 12:42 pm