18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

१९९ रुपयांत एअरटेल देणार १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्स

आकर्षक ऑफर

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 3, 2017 3:36 PM

रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजवली असतानाच आता जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनेही आपले अनोखे प्लॅन्स लाँच करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच कंपनीने एक १९९ रुपयांचा प्लॅन जाहीर केला असून, आता एअरटेलची सेवा वापरत असलेल्या ग्राहकांना या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये १ जीबी डेटा मिळणार असून, अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळणार आहे. यामध्ये लोकल आणि एसटीडी अशा दोन्हींचा समावेश आहे. त्यामुळे एअरटेलच्या या ऑफर्स ग्राहकांना नक्कीच आकर्षित करतील अशी कंपनीला आशा आहे.

सुरुवातीला हा नवीन १९९ रुपयांचा प्लॅन एअरटेलच्या ठराविक यूजर्ससाठीच उपलब्ध असेल. तर नव्याने एअरटेलचे ग्राहक होणाऱ्यांसाठी कंपनीने १७८ आणि १७९ रुपयांचे दोन नवीन प्लॅन जाहीर केले आहेत. मात्र १७८ रुपयांच्या प्लॅनमध्ये १९९ रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच सर्व सुविधा ग्राहकांना मिळू शकणार आहेत. मात्र हा १७८ रुपयांचा प्लॅन म्हणजे रिचार्ज प्लॅन असल्याने केवळ पहिल्या किंवा दुसऱ्या वेळी रिचार्ज केल्यासच ग्राहकांना त्याचा फायदा मिळू शकणार आहे. हे सगळे प्लॅन्स २८ दिवसांसाठी वैध असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.

जिओ फोनला टक्कर देणार ‘या’ टेलिकॉम कंपन्या

याशिवायही कंपनीने आपले अनेक नवीन प्लॅन लाँच केले आहेत. एअरटेलने लॉंन्च केलेल्या प्लॅनपैकी सर्वात लहान प्लॅन केवळ ८ रूपयांचा आहे. तर, ३९९चा प्लान हा सर्वात महाग प्लान आहे. मात्र हे सर्व प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आहेत. ८ रूपयांच्या छोट्या प्लॅनमध्ये तुम्हाला ५६ दिवसांची वैधता मिळते. तसेच, सर्व लोकल आणि एसटीडी कॉल ३० पैसे प्रतिमिनिट दराने करता येणार आहेत. याशिवाय ४० रूपयांच्या प्लॅनमध्ये ३५ रूपयांचा टॉकटाईम दिला जातो. जो अनलिमिटेड काळासाठी वैध आहे. ६० रूपयांतही अनलिमिटेड वैधता असलेला एक प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ५८ रूपये इतका टॉकटाईम मिळतो.

First Published on October 3, 2017 3:36 pm

Web Title: airtel launch new plan of rs 199 offering 1gb data and unlimited voice calls