X

३९९ रुपयांच्या प्लॅनवर एअरटेल देणार ३०० रुपयांची सूट

सध्या बाजारात व्होडाफोनचा २९९ रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. त्याला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आपला हा आकर्षक प्लॅन लॉन्च केला आहे.

मागच्या काही दिवसांपासून एअरटेल, व्होडाफोन आणि जिओ यांच्यातील स्पर्धा तीव्र झाली आहे. रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केल्यापासून ही स्पर्धा चांगलीच रंगली आहे. ग्राहकांना एकाहून एक आकर्षक प्लॅन देण्यासाठी या सर्व कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. यामध्ये एअरटेलच्या आणखी एका प्लॅनची भर पडली आहे. हा पोस्टपेड प्लॅन असून तो ३९९ रुपयांचा आहे. मात्र यावर डिस्काऊंट देण्यात येणार असून ग्राहकांना दरमहा ५० रुपयांचे व्हाऊचर मिळणार आहे. हे व्हाऊचर एका महिन्यासाठी नाही तर पुढील ६ महिन्यांसाठी मिळणार आहे, त्यामुळे त्याची किंमत ३०० रुपये इतकी होते. म्हणजेच ३९९ रुपयांच्या प्लॅनवर ग्राहकांना ३०० रुपये सूट मिळणार आहे.

सध्या बाजारात व्होडाफोनचा २९९ रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. त्याला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आपला हा आकर्षक प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना २० जीबी इंटरनेट डेटाही मिळणार आहे. हा डेटा ३ जी आणि ४जी फोनला सपोर्ट करणार असून उरलेला डेटा पुढील महिन्याला वापरता येणार आहे. याशिवाय वर्षभरासाठी अतिरिक्त २० जीबी डेटा मिळणार आहे. तसेच यामध्ये मोफत कॉलिंग आणि १०० मेसेजची सुविधाही देण्यात आली आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांना तीन महिन्यांसाठी विंक म्युझिक आणि एअरेल टीव्हीचे मोफत सबस्क्रीप्शनचा लाभ मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच कंपनीने ८ दिवसांची वैधता असलेला ४७ रुपयांचा प्लॅन लाँच केला होता. यामध्ये ग्राहकांना लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंगसाठी १२५ मिनिटे मोफत मिळणार आहेत. याबरोबरच ५० मेसेज आणि ५०० एमबीचा २जी/३जी/४जी डेटा मिळत आहे. विशेषत: हा प्लॅन रिलायन्स जिओच्या ५२ रुपयांच्या प्लॅनला तसेच वोडाफोनच्या ४७ रुपयांच्या प्लॅनला टक्कर देत आहे. हा प्लॅन विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा इतर ग्राहकांनाही अतिशय उपयुक्त ठरणार आहे. याबरोबरच एअरटेलने ९९ रुपयांचा आणखी एक प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय १०० मेसेज मिळणार असून या प्लॅनची वैधता १० दिवसांची आहे. एअरटेलने याआधी ४९, २८, २९ रुपयांचे वेगवेगळे प्लॅन लाँच केले होते.