02 December 2020

News Flash

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा २१९ रुपयांचा प्लॅन

नवीन प्लॅनमध्ये एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर देणार आहे. यामध्ये एअरटेलच्या ग्राहकांना मोफत हॅलो ट्यून्स मिळणार आहेत.

टेलिकॉम बाजारात सध्या जोरदार वॉर सुरु आहे. एका कंपनीने एखादी ऑफर किंवा प्लॅन जाहीर केला की लगेचच दुसरी कंपनी त्याला टक्कर देण्यासाठी आकर्षक प्लॅन जाहीर करते. सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांमध्येही जोरदार स्पर्धा सुरु असल्याचे दिसत आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्या एकाहून एक ऑफर्स जाहीर करत आहेत. नुकताच एअरटेलने आपला २१९ रुपयांचा प्लॅन जाहीर केला असून तो प्रीपेड ग्राहकांसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज १.४ जीबी ४ जी डेटा मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० मेसेज मोफत मिळणार आहेत. या प्लॅनची वैधता २८ दिवस असेल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. एअरटेलच्या आधीच्या १९९ रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच हा प्लॅन असेल. मात्र या नवीन प्लॅनमध्ये एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर देणार आहे. यामध्ये एअरटेलच्या ग्राहकांना मोफत हॅलो ट्यून्स मिळणार आहेत.

ही ऑफर कंपनीच्या माय एअरटेल अॅप्लिकेशनवर तसेच वेबसाईटवर उपलब्ध आहे. पण तुम्हाला हॅलो ट्यून्स नको असतील तर तुम्ही जुना १९९ रुपयांचा प्लॅन घेऊ शकता. यामध्येही दिवसाला १.४ जीबी डेटा म्हणजेच २८ दिवसासाठी ३९.४ जीही डेटा मिळेल. तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळेल. रिलायन्स जिओच्या १४९ आणि १९८ च्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी हा नवीन प्लॅन कंपनीने बनवला आहे. १४९ च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १.५ जीबी ४ जी डेटा मोफत मिळतो. तसेच रोज १०० मेसेज आणि व्हॉईस कॉलिंगही मोफत मिळते. तर १९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी रोज २ जीबी डेटा रोज १०० मेसेज आणि व्हॉईस कॉलिंगही मोफत मिळते. रिलायन्स आपल्या काही प्लॅन्समध्ये अनलिमिटेड हॅलो ट्यून्स देत असल्याने एकअरटेलने त्याला टक्कर देण्यासाठी आपला हा २१९ रुपयांचा प्लॅन जाहीर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 11:01 am

Web Title: airtel launched new plan 219 to compete with reliance jio free hello tunes
Next Stories
1 बदाम सेवनाने हृदयरोगाचा धोका दूर
2 युट्यूबने ५० लाख व्हिडीयो डिलीट केले कारण…
3 जाणून घ्या व्हॉट्सअॅप बॅकअपच्या नव्या फिचरबद्दल
Just Now!
X