News Flash

एअरटेलने लाँच केले 5 शानदार प्लॅन

भारती एअरटेलने दिवाळीची संधी साधत पाच नवे प्लॅन लाँच केले आहेत.

भारती एअरटेलने दिवाळीची संधी साधत आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी पाच नवे प्रीपेड पॅक लाँच केले आहेत. एअरटेलने 178 रुपये, 229 रुपये, 344 रुपये, 495 रुपये आणि 559 रुपयांचे प्लॅन लाँच केले आहेत. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल सातत्याने नवनवे प्लॅन लाँच करत आहे.

एअरटेलने लाँच केलेल्या या पाचही प्लॅनचा फायदा केवळ नव्याने जोडल्या गेलेल्या ग्राहकांना होणार आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया 178 रुपयांच्या प्लॅनबद्दल. यामध्ये ग्राहकांना दररोज 1 जीबी 4 जी डेटा मिळेल. 28 दिवस या प्लॅनची वैधता असेल. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादीत कॉलिंगसह 100 एसएमएस दररोज मिळतील.

229 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता असून दररोज 1.4 जीबी डेटा मिळेल. म्हणजे युजरला एकूण 39.2 जीबी डेटा वापरता येईल. तर 344 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा 28 दिवसांच्या वैधतेसह मिळेल. 495 आणि 559 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.4 जीबी डेटा युजरला मिळेल. 495 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवस तर 559 रुपयांच्या प्लॅनची वैधता 90 दिवस असेल. या सर्व प्लॅनमध्ये अमर्यादीत लोकल, एसटीडी आणि मोफत नॅशनल रोमिंगची सुविधा, तसंच 100 एसएमएस दररोज वापरण्यासाठी मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 5:21 pm

Web Title: airtel launches five new plans
Next Stories
1 Flipkart Sale : नोकिया 6.1 प्लस कसा मिळवाल केवळ 1149 रुपयांत?
2 दिवाळीची आकर्षक मराठी शुभेच्छापत्रे
3 जिओला टक्कर देण्यासाठी आयडियाचा 159 रुपयांचा नवा प्लॅन
Just Now!
X