भारती एअरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी वर्षभर वैधता असलेला नवा अॅन्युअल प्लॅन लाँच केला आहे. 1699 रुपयांच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल, एसएमएस आणि दररोज 1 जीबी डेटा मिळेल. रिलायंस जिओचाही 1699 रुपयांचा रिचार्ज प्लॅन असून जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने हा प्लॅन लाँच केला आहे.

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये 365 जीबी इंटरनेट डेटा मिळेल, म्हणजेच दररोज 1 जीबी डेटा ग्राहकाला मिळणार आहे. याशिवाय अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉल्स व रोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. सध्या हा प्लॅन केवळ हिमाचल प्रदेशमध्ये लाँच करण्यात आला आहे. मात्र, लवकरच सर्वत्र हा प्लॅन लाँच केला जाईल.

दुसरीकडे, यापूर्वीच रिलायंस जिओने 365 दिवस वैधता असलेला 1699 रुपयांचा प्लॅन लाँच आणला आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी इंटरनेट डेटा वापरण्यासाठी मिळतो. म्हणजेच 365 दिवसांसाठी जिओकडून 547.5 जीबी डेटा मिळतो. तसंच अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉल व रोज 100 एसएमएसची सेवाही मिळते. याव्यतिरिक्त व्होडाफोननेही 1499 रुपयांमध्ये 365 रुपयांमध्ये दररोज 1 जीबी डेटाचा प्लॅन आणला आहे.