21 February 2019

News Flash

१५९ रुपयांत एअरटेलचा धमाकेदार प्लॅन

व्होडाफोनचाही १५९ रुपयांचा प्लॅन असून जिओचा याच प्लॅनशी मिळताजुळता असलेला १४९ रुपयांचा प्लॅन आहे याला टक्कर देण्यात येणार आहे.

मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या जोरदार वॉर सुरु असून एकमेकांमध्ये वरचढ होण्यासाठी या कंपन्या सातत्याने नवनवीन प्लॅन जाहीर करत असतात. रिलायन्स जिओ आणि व्होडाफोनला टक्कर देण्यासाठी एअरटेलने नुकताच एक प्रीपेड प्लॅन जाहीर केला आहे. १५९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेटच्या आकर्षक सुविधा मिळणार आहेत. यामध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डेटा मिळणार असून अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी २१ दिवसांची असून अनलिमिटेड कॉलिंगबरोबरच यामध्ये रोज १०० मेसेज मोफत मिळणार आहेत. या प्लॅनला टक्कर देणारे व्होडाफोन आणि जिओचे प्लॅन आहेत. व्होडाफोनचाही १५९ रुपयांचा प्लॅन असून जिओचा याच प्लॅनशी मिळताजुळता असलेला १४९ रुपयांचा प्लॅन आहे.

मात्र व्होडाफोन २८ दिवसांची व्हॅलिडीटी देत असून बाकी सुविधा सारख्याच आहेत. तर रिलायन्स जिओ १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग आणि रोज १०० मेसेज तर मिळणार आहेतच. पण सोबत रोज १.५ जीबी डेटा देण्यात येणार आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण ४२ जीबी डेटा मिळणार आहे. एकूणच काय तर रिलायन्स जिओमुळे स्पर्धा निर्माण झाली आणि सर्वच कंपन्यांनी आपले दर घटवले. त्यामुळे कंपन्यांना हे काही प्रमाणात हे परवडणारे नसले तरीही ग्राहकांचा मात्र यामध्ये नक्कीच फायदा आहे. याआधी काही दिवसांपूर्वीच एअरटेलने १९५ रुपयांचा प्लॅन बाजारात आणला होता. २८ दिवसांच्या या प्लॅनमध्ये रोज १.२५ जीबी डेटा आणि रोज १०० मेसेज तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती. तर रोज १ जीबी डेटा देणारा कंपनीचा १६८ रुपयांचा प्लॅन होता. आता तोच १५९ रुपयांवर आणण्यात आला आहे.

First Published on October 9, 2018 1:34 pm

Web Title: airtel new plan of rs 159 daily 1 gb internet data 21 days validity