19 October 2020

News Flash

Airtel ची ऑफर, ‘या’ खास प्लॅनमध्ये आता 10 पट जास्त डेटा

3GB डेटाऐवजी मिळणार 30 जीबी डेटा

टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. कंपनीने आपल्या 401 रुपयांच्या Disney+ Hotstar VIP प्लॅनमध्ये बदल केला आहे. 401 रुपयांच्या या प्लॅनमध्ये आता कंपनी आपल्या युजर्सना आधीपेक्षा 10 पट जास्त डेटा देत आहे. कंपनी या प्लॅनमध्ये आता 3GB डेटाऐवजी 30 जीबी डेटा देत आहे.

एअरटेलने एप्रिल महिन्यात Disney+ Hotstar VIP प्लॅन लाँच केला होता. 401 रुपये किंमती्च्या या प्लॅनमध्ये त्यावेळी कंपनी 28 दिवसांच्या वैधतेसह 3GB डेटा आणि मोफत Disney+ Hotstar VIP सब्स्क्रिप्शन देत होती. पण, टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार कंपनी आता या प्लॅनमध्ये 3GB डेटाऐवजी तब्बल 30 जीबी डेटा देत आहे. मात्र, एअरटेलच्या या प्लॅनमध्ये मोफत व्हॉइस कॉलिंग किंवा एसएमएसची सेवा युजर्सना भेटत नाही.

या प्लॅनशिवाय कंपनीकडे Disney+ Hotstar VIP सब्स्क्रिप्शन देणारे अन्य काही प्रीपेड प्लॅनही आहेत. यात 2,698 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये एका वर्षाच्या वैधतेसह दररोज 2जीबी डेटा मिळतो, याशिवाय 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज 2जीबी डेटा ग्राहकांना वापरता येतो. तर, 448 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 3जीबी डेटा मिळतो.

दरम्यान, एअरटेलने आपले 129 रुपये आणि 199 रुपयांचे प्रीपेड रिचार्ज प्लॅनही भारतात सर्व सर्कलमध्ये उपलब्ध केले आहेत. कंपनीने सर्वप्रथम मे महिन्यात हे दोन प्लॅन काही निवडक सर्कलमध्ये लाँच केले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात अजून काही सर्कलमध्ये हे उपलब्ध झाले होते. तर, आता हे दोन्ही प्लॅन देशभरातील सर्व सर्कलमध्ये उपलब्ध झाले आहेत. सविस्तर जाणून घेऊया दोन्ही प्लॅन्सबाबत –

129 रुपयांचा प्लॅन-
या दोन्ही प्लॅनची वैधता 24 दिवसांची आहे. दोन्ही प्लॅनमध्ये हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. 24 दिवसांची वैधता असलेल्या 129 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅनमध्ये 1 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा फायदाही ग्राहकांना मिळेल. या प्लॅनमध्ये 300 एसएमएस वापरण्यास मिळतात. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये ग्राहकांना एअरटेल एक्स्ट्रिम आणि विंक म्यूझिकचं मोफत सबस्क्रिप्शन मिळतं, तसेच हेलो ट्यून्सची सेवाही मोफत वापरण्यास मिळते.

199 रुपयांचा प्लॅन –
129 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे 199 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटीही 24 दिवस आहे. यात दररोज 1 जीबी हाय-स्पीड डेटा आणि रोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा फायदाही मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्येही एअरटेल एक्स्ट्रिम, विंक म्यूझिक आणि हेलो ट्यून्सची सेवा मोफत वापरण्यास मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 9:13 am

Web Title: airtel now offers 10 times more data in rs 401 disney hotstar plan says report check details sas 89
Next Stories
1 येतोय ‘मेड इन इंडिया’ iPhone 12, ‘आयफोन 11’ पेक्षा कमी असणार किंमत !
2 VIDEO: मुलांच्या स्क्रीनटाइममधील पाच मिनिटांचा अडथळा
3 ‘बजाज’ची स्वस्त बाइक आली नवीन व्हेरिअंटमध्ये, जाणून घ्या किंमत
Just Now!
X