News Flash

Airtel फ्रीमध्ये देतंय 5GB डेटा, फक्त डाउनलोड करावं लागेल ‘हे’ App !

एअरटेलने आणली भन्नाट ऑफर...

(प्रतिकात्मक छायाचित्र)

टेलीकॉम कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर आणत असतात. अनेकदा फ्री डेटा आणि कॉलिंगची ऑफरही टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांना दिली जाते. एअरटेलनेही आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना 5 जीबीपर्यंत फ्री डेटा मिळतोय. सविस्तर जाणून घेऊया या ऑफरबाबत :-

एअरटेलची ही ऑफर New 4G SIM or 4G Upgrade Free Data Coupons या नावाने बाजारात आलीये. याअंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांना फ्रीमध्ये 5 जीबी डेटा देत आहे. हा डेटा एक-एक जीबीच्या पाच कुपनद्वारे मिळेल. यातील पहिला एक जीबी डेटा Airtel Thanks अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर मिळेल. मात्र ही ऑफर पहिल्यांदा एअरटेल थँक्स अ‍ॅप डाउनलोड करणाऱ्यांसाठीच आहे. याशिवाय एअरटेलचं नवं सिम कार्ड घेणाऱ्यांना किंवा जुनं 3जी सिम कार्ड 4जीमध्ये अपग्रेड करणाऱ्यांनाच या ऑफरचा लाभ मिळेल.

ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी पहिल्यांदा एअरटेल थँक्स अ‍ॅप डाउनलोड करुन मोबाइल नंबरद्वारे रजिस्ट्रेशन करावं. सिम घेतल्यानंतर ३० दिवसांमध्येच रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये एक-एक जीबीचे पाच कुपन 72 तासांमध्ये मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 12:34 pm

Web Title: airtel offering 5gb data free for first time airtel thanks app downloaders sas 89
Next Stories
1 Flipkart Black Friday Sale चा अखेरचा दिवस, स्मार्टफोन्सवर 33 हजारापर्यंत डिस्काउंट
2 किंमत 8000 रुपयांपेक्षाही कमी, Vivo Y1s भारतात झाला लाँच
3 Google ने दिला झटका, ‘या’ अ‍ॅपमधून हटवलं ग्रुप व्हिडिओ कॉलिंग फिचर
Just Now!
X