16 December 2017

News Flash

एअरटेलच्या या प्लॅन्समध्ये मिळणार रोज ३ जीबी ४ जी डेटा

ग्राहकांना मिळणार अनोख्या सुविधा

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 5, 2017 11:00 AM

रिलायन्स जिओने बाजारात मोफत इंटरनेटची सुविधा आणल्यापासून टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. एअरटेल कंपनीही मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभागी झाल्याचे म्हणता येईल. कारण नुकतेच एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी अतिशय आकर्षक असे प्लॅन्स जाहीर केले आहेत. एअरटेलने नुकत्याच जाहीर केलेल्या ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी ८४ जीबी इंटरनेट डेटा ३ जी आणि ४ जी स्पीडने वापरता येणार आहे. म्हणजेच ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा वापरता येणार आहे.

‘माय एअरटेल’ या अॅपवरुन तसेच एअरटेलच्या वेबसाईटवरुन प्रीपेड सुविधा वापरणारे ग्राहक रिचार्ज करु शकतील. कंपनीने मागील महिन्यातच आपला ९९९ रुपयांचा प्लॅन बाजारात आणला होता. यामध्ये ग्राहकांना दररोज ४ जीबी इंटरनेट डेटा मोफत मिळत होता. ज्या ग्राहकांना विविध कामांसाठी जास्त इंटरनेट वापरण्याची आवश्यकता असते अशांना हे प्लॅन उपयुक्त ठरु शकतात असे कंपनीचे म्हणणे आहे. याशिवाय ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एसटीडी आणि लोकल कॉलिंगही मोफत मिळणार आहे. मात्र यामध्ये प्रत्येक दिवसासाठी २५० मिनीटे आणि आठवड्यासाठी १ हजार मिनीटे मोफत मिळतील असे स्पष्टीकरणही कंपनीने दिले आहे. मोफत कॉलिंगची मर्यादा संपल्यानंतर ग्राहकांना एअरटेल ते एअरटेल १० पैसे प्रतिमिनीट दराने तर एअरटेल ते अन्य नेटवर्कसाठी ३० पैसे प्रतिमिनीट हा दर पडेल. एअरटेल पेमेंट्स बँकमधून हा प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना ५० टक्के कॅशबॅक ऑफरही मिळू शकते.

याशिवायही कंपनीने आपले अनेक नवीन प्लॅन लाँच केले आहेत. एअरटेलने लाँच केलेल्या प्लॅनपैकी सर्वात लहान प्लॅन केवळ ८ रूपयांचा आहे. तर, ९९९चा प्लान हा सर्वात महाग प्लान आहे. मात्र हे सर्व प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आहेत. ८ रूपयांच्या छोट्या प्लॅनमध्ये तुम्हाला ५६ दिवसांची वैधता मिळते. तसेच, सर्व लोकल आणि एसटीडी कॉल ३० पैसे प्रतिमिनिट दराने करता येणार आहेत. याशिवाय ४० रूपयांच्या प्लॅनमध्ये ३५ रूपयांचा टॉकटाईम दिला जातो. जो अनलिमिटेड काळासाठी वैध आहे. ६० रूपयांतही अनलिमिटेड वैधता असलेला एक प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ५८ रूपये इतका टॉकटाईम मिळतो.

First Published on October 5, 2017 11:00 am

Web Title: airtel offers 3gb data per day at rs 799 to prepaid customers