रिलायंस जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या तिन्ही कंपन्यांकडे दररोज इंटरनेट डेटासाठी अनलिमिटेड प्लॅन आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोजच्या वापरासाठी 3जीबीपर्यंत डेटा मिळतो. पण, अनेक युजर्स दररोज मिळणारा इंटरनेट डेटा लवकरच संपवतात. अशा युजर्ससाठी टेलिकॉम कंपन्या केवळ डेटा प्लॅन आणतात. या डेटा प्लॅनद्वारे रिचार्ज करुन दररोज मिळणारा इंटरनेट डेटा संपल्यानंतरही इंटरनेटचा वापर करता येतो. आज आम्ही तुम्हाला रिलायंस जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील डेटा प्लॅन्सची माहिती देणार आहोत.

आणखी वाचा- Airtel चे तीन शानदार प्लॅन , अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 2GB पर्यंत डेटा

रिलायंस जिओ 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे जिओकडे दोन डेटा प्लॅन आहेत. एक 11 रुपयांचं व्हाउचर असून यामध्ये 400 एमबी डेटा मिळतो. दुसरा 21 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये 1 जीबी डेटा मिळतो. तुमच्याकडे आधीपासून असलेल्या प्लॅनची वैधता जेवढे दिवस असेल तितकेच दिवस या प्लॅन्सचीही वैधता असेल. याशिवाय ५० रुपयांमध्ये अवघा एक रुपया अधिक टाकून म्हणजेच 51 रुपयांमध्ये 3 जीबी इंटरनेट डेटा मिळतो.

व्होडाफोन – 16 रुपयांचा एक प्लॅन तर दुसरा प्लॅन 48 रुपयांचा आहे. 16 रुपयांच्या प्लॅनमध्ये एका दिवसाच्या वैधतेसह 1 जीबी डेटा आणि 48 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 3 जीबी डेटा मिळतो.

एअरटेल – 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीत एअरटेलकडे केवळ एक प्लॅन आहे. 48 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा मिळतो. २८ दिवस या प्लॅनची वैधता आहे.