रिलायंस जिओ आणि भारती एअरटेल या दोन्ही आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होतेय. दोन्ही कंपन्यांनी आपली ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी अनोखा जुगाड शोधला असून एकमेकांचे ग्राहक पळवण्यासाठी रिटेलर्सना इन्सेंटिव्ह(बक्षिसी) जाहीर केले आहे.

भारती एअरटेलने रिटेलर्सला जिओचे दोन ग्राहक तोडण्यासाठी 100 रुपयांचे इन्सेंटिव्हज दिले जात असल्याचे अनेक डिस्ट्रिब्युटर्स आणि किरकोळ विक्रेत्यांनी म्हटलं आहे. तर, जिओने नव्या सीमकार्ड विक्रीचे कमिशन 100 रुपयांपर्यंत वाढवलं आहे. जिओकडून रिटेलर्सला प्रत्येक सीमकार्ड विक्रीमागे 40 रुपये कमिशन दिले जात होते. ते कमिशन थेट 100 रुपये करण्यात आलं आहे.

गेल्याच आठवड्यात व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ या तीन कंपन्यांनी मोबाइल सेवा दर वाढवले. त्यांनतर आता ग्राहक संख्या वाढण्याचा सपाटा या कंपन्यांनी लावला आहे. त्यासाठी त्यांनी किरकोळ विक्रेत्यांना आकर्षक इन्सेंटिव्हज देऊ केले आहेत.