नवीन प्रीपेड प्लॅन खरेदी करताना कोणताही युजर फ्री कॉलिंग, इंटरनेट डेटा आणि व्हॅलिडिटी या तीन बाबींचा जास्त विचार करतो. आज आम्ही तुम्हाला देशातील तीन आघाडीच्या कंपन्यांकडे( एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन ) असलेल्या अशाच एका प्लॅनबाबत सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये युजर्सना डेटा आणि कॉलिंगसोबतच 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

एअरटेलचा 698 रुपयांचा प्लॅन:
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि रोज 100SMS देते. तसेच यामध्ये एअरटेल एक्स्ट्रीम सर्व्हिस, फ्री हेलो ट्यून, फ्री विंक म्युझिक सर्व्हिस, शॉ अ‍ॅकेडमीचा फ्री ऑनलाइन कोर्स आणि FASTag वर 150 रुपये कॅशबॅक मिळतात. 84 दिवस इतकी या प्लॅनची व्हॅलिडिटी आहे.

व्होडाफोनचा 699 रुपयांचा प्लॅन:
व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. पण सध्या कंपनीने डबल डेटा ऑफर आणली आहे. त्यामुळे या प्लॅनमध्ये दररोज एकूण 4GB डेटा ग्राहकांना वापरण्यास मिळत आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि दररोज 100SMS चा फायदाही मिळतो. याशिवाय ग्राहकांना 499 रुपयांची व्होडाफोन-प्ले सर्व्हिसचा मोफत अ‍ॅक्सेस, तसेच एका वर्षापर्यंत मोफत झी-5 सब्स्क्रिप्शनही दिलं जात आहे.

जिओचा 599 रुपयांचा प्लॅन:
रिलायन्स जिओचा हा प्लॅन 84 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅन्सच्या यादीत सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा वापरण्यास मिळतो. दररोज 2GB डेटामर्यादा संपल्यानंतर स्पीड कमी (64 kbps)होतो. याशिवाय या प्लॅनमध्ये जिओ-टू-जिओ फ्री कॉलिंग, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3,000 मिनिटे आणि रोज 100SMS चा फायदा मिळतो. तसेच, Jio TV आणि Jio Saavn यांसारख्या जिओ अ‍ॅप्सचाही मोफत अ‍ॅक्सेस मिळतो.