Airtel Vs Reliance Jio Vs Vodafone: Latest cheapest plans under 400 Rs for users compared: सध्या देशातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये ऑफर्सची स्पर्धा सुरु आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यातही जिओने बाजारात प्रवेश केल्यानंतर ही स्पर्धा आणखीन तीव्र झाली आहे. सध्या तर आठवड्याला दोन ते तीन नवीन प्लॅन या कंपन्या बाजारात आणताना दिसत आहेत. नुकताच जिओने बाजारात डबल धमाका ऑफर बाजारात लॉन्च केली आहे. ४०० रुपयांहून कमी किंमतीच्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाले जर अंबानींच्या मालिकची असणारी जीओ कंपनी ९८ रुपयांमध्ये २८ दिवसांसाठी २ जीबी हायस्पीड इंटरनेटची सुविधा देत आहे. जीओच्या लोकप्रिय ऑफर्समध्ये ९८, १४९ आणि ३९९ च्या रिचार्जचा समावेश होतो. या ४०० रुपयांखालील प्लॅन्समध्ये ग्राहकांना हायस्पीड इंटरनेटबरोबरच अमर्याद व्हॉइस कॉल्स (रोमिंग सहित) आणि मर्यादीत मोफत मेसेजची सोयही दिली जाते. मात्र ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅन्सला पसंती मिळत असतानाच एअरटेल आणि व्होफोननेही ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये ९९ रुपये, १४९ रुपये, १९९ रुपये, ३४९ रुपये आणि ३९९ रुपये असे प्लॅन्स बाजारात उतरवले आहेत. जीओला टक्कर देण्यासाठी हे प्लन्स दोन्ही कंपन्यांनी ऑफर्सचा भडीमार सुरु केला आहे. मात्र एकाच वेळी तीन बड्या कंपन्यांकडून इतक्या मोठ्या संख्येने ऑफर्स असताना कोणत्या प्लॅनमध्ये काय मिळणार हे अनेकदा समजत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगत आहोत ४०० रुपयांखालील एअरटेल, जीओ आणि व्होडाफोन्सच्या ऑफर्सबद्दल…

>>रिलायन्स जीओ:

९८ रुपयांचा प्लॅन
२८ दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅनमध्ये २ जीबी फोरजी डेटा रोज मिळेल. आता हा प्लॅन अपडेट झाला आहे. नवीन प्लॅननुसार आता ९८ रुपयांच्या या सुपरसेव्हर प्लॅनमध्ये लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स मोफत देण्यात आले आहेत. तसेच या प्लॅनमध्ये ३०० एसएमएस देण्यात आले आहेत.

१४९ रुपयांचा प्लॅन
रोज तीन जीबी डेटा वापरता येणारा हा प्लॅन २८ दिवसांच्या कालमर्यादेसहित उपलब्ध आहे. म्हणजेच महिन्याभरात १४९ रुपयांत ग्राहकांना ८४ जीबी डेटा मिळेल.

१९८ रुपयांचा प्लॅन
हा प्लॅन १४९ च्या प्लॅनसारखाच असला तरी रोज साडेतीन जीबी डेटा ग्राहकांना वापरता येईल. म्हणजेच महिन्याला ९८ जीबी इंटरनेट केवळ १९८ रुपयांत उपलब्ध होईल.

२९९ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनची वैधता ही २८ दिवसांची आहे ज्यामध्ये रोज ४.५ जीबी थ्री जी अथवा फोर जी डेटा ग्राहकांना मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स आणि रोजचे १०० एसएमएस मोफत मिळणार आहेत. हा नवीन प्लॅन केवळ ३० जूनपर्यंत वापरता येणार आहे.

३९९ रुपयांचा प्लॅन
आता या प्लॅनमध्ये ३ जीबीचं ४ जी इंटरनेट डेटा मिळतो. विशेष म्हणजे या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये एकूण २५२ जीबी डेटा मिळतो. तसेच अमर्याद कॉल आणि रोज १०० एसएमएसचाही या प्लॅनमध्ये समावेश आहे.

>> एअरटेल:

१४९ रुपयांचा प्लॅन
२८ दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅनमध्ये २ जीबी फोरजी डेटा रोज मिळेल. तसेच अर्मयाद व्हॉइस कॉल आणि रोजचे १०० एसएमएस फ्री मिळतील.

१९९ रुपयांचा प्लॅन
रोज २.४ जीबी डेटा वापरता येणारा या प्लॅनची कालमर्यादा २८ दिवसांची आहे. म्हणजेच २८ दिवसांत ६७.२ जीबी डेटा युझर्सला वापरता येईल. या प्लॅनमध्येही अर्मयाद व्हॉइस कॉल आणि रोजचे १०० एसएमएस फ्री मिळतील.

३४९ रुपयांचा प्लॅन
२८ दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅनमध्ये ३ जीबी फोरजी डेटा रोज मिळेल. म्हणजेच २८ दिवसांत एकूण ८४ जीबी डेटा युझर्सला वापरता येईल.

३९९ रुपयांचा प्लॅन
या प्रीपेड प्लॅननुसार ८४ दिवसांसाठी युझर्सला रोज २.४ जीबी डेटा वापरता येईल. म्हणजेच ८४ दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅनमध्ये एकूण २०१ जीबी डेटा देण्यात येत आहे.

>> व्होडाफोन:

१९९ रुपयांचा प्लॅन
या प्रिपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना १.४ जीबी हायस्पीड नेट रोज उपलब्ध होईल. या प्लॅनची वैधता इतर दोन्ही कंपन्यांप्रमाणे २८ दिवसांची असून या प्लॅनमध्येही अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स मोफत उपलब्ध आहे.

२५५ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये २ जीबी थ्रीजी किंवा फोरजी डेटा रोज मिळेल. २८ दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स मोफत उपलब्ध आहे.

३४८ रुपयांचा प्लॅन
या प्लॅननुसार युझर्सला रोज अडीच जीबी डेटा वापरण्यासाठी उपलब्ध होईल. याशिवाय या प्लॅनमध्येही इतर प्लॅनप्रमाणे अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स मोफत उपलब्ध आहे.

३४९ रुपयांचा प्लॅन
२८ दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅनमध्ये ३ जीबी फोरजी डेटा रोज मिळेल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स मोफत उपलब्ध आहे. २८ दिवसांत एकूण ८४ जीबी डेटा युझर्सला वापरता येईल.

३९९ रुपयांचा प्लॅन
७० दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅनमध्ये रोज १.४ जीबी इंटरनेट उपलब्ध होईल. तसेच अर्मयाद व्हॉइस कॉल आणि रोजचे १०० एसएमएस फ्री मिळतील.

थोड्याफार फरकाने प्लॅन्स एकसारखेच असले तरी तुमच्या परिसरात कोणत्या नेटवर्कला चांगली रेंज आहे यावरुन तुम्ही कंपनी आणि प्लॅनचा विचार करु शकता.