Airtel ने आपली ‘Xstream Fiber ब्रॉडबँड’ या सेवेसाठी देशातील 25 शहरांमध्ये प्री-बुकिंगला सुरूवात केली आहे. कंपनी यातील काही शहरांमध्ये 30 एप्रिल ते 1 मे यादरम्यान ही सेवा सुरू करणार होती, पण करोनाच्या संकटामुळे यामध्ये उशीर झाला. यानंतर ही सेवा जून महिन्याच्या सुरूवातीलाच सुरू करायचा एअरटेलचा विचार होता. पण, लॉकडाउन वाढल्यानंतर कंपनीला या योजनेतही बदल करावा लागला.

‘launching soon’ टॅगसह शहरांची नावं :-
एअरटेलने आपल्या वेबसाइटवरुन जून महिन्याच्या सुरूवातीलाच ‘काउंटडाउन टाइमर’ हटवला होता. आता कंपनीने एअरटेल एक्सट्रीम फायबरच्या वेबसाइटवर ‘launching soon’ टॅगसोबत ज्या शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे त्यांची नावं दिली आहेत. त्यानुसार, कोल्हापूर, अजमेर, अलिगढ, भिलवाडा, बीकानेर, बूंदी, धर्मशाला, गाजीपूर, गोरखपूर, होसुर, जगधारी, झांसी, जोधपूर, काकिनाडा, कोटा, मथूरा आणि मिर्जापूर, मुजफ्फरनगर, रोहतक, शाहजहांपूर, शिमला, थंजावूर, तिरुपती, उदयपूर आणि यमुनानगर या शहरांचा समावेश आहे.

फ्री राउटर आणि इंस्टॉलेशन :-
या २५ शहरांमध्ये जे ग्राहक एअरटेल एक्सट्रीम फायबर ब्रॉडबँड कनेक्शनसाठी प्री-बुकिंग करतील त्यांना फ्री राउटर आणि फ्री इंस्टॉलेशनचा फायदा मिळेल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. या 25 शहरांमध्ये एअरटेलने बेसिक, एंटरटेनमेंट, प्रीमियम आणि व्हीआयपी असे चार प्लॅन ठेवले आहेत.