लॉकडाऊनमध्ये अगदी तरुणांपासून ते घरातून काम करणाऱ्यांना (work from home) इंटरनेट सेवा पुरत नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेकांचं इंटरनेट वापराचं प्रमाणही प्रचंड वाढलेय. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन एअरटेलनेही एक भन्नाट प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये तुम्ही ५० जीबी डेटा एका दिवसात वापरू शकता. एअरटेलच्या या खास प्लॅनमुळे जिओच्या वर्क फॉर्म होम प्लॅनला चांगलीच टक्कर बसणार आहे.

एअरटेलनं लाँच केलेल्या या नव्या डेटा व्हाऊचरची किंमत २५१ रुपये आहे. यामध्ये अनलिमिटेड ५० जीबी डेटा वापरता येणार आहे. पॅकची वैधतेनुसार ग्राहकांना एका दिवसात डेटा संपवायचा आहे. हे फक्त डेटासाठी व्हाऊचर असल्यामुळे यासोबत एसएमएस किंवा मोफत कॉलिंगची सुविधा नाही.

डेटाची वाढती मागणी आणि प्रसिद्धी पाहून एअरटेलने आपल्या ९८ रूपयांच्या डेटा व्हाऊचर प्लॅनमध्येही बदल केला आहे. एअरटेलने या पॅकमध्ये दिला जाणारा डेटा डबल केला आहे. सुरूवातीला ९८ रूपयांत ६ जीबी डेटा मिळत होता आता १२ जीबी डेटा दिला आहे.

त्याशिवाय एअरटेलने ग्राहकांसाठी ४०१ रुपयांचा प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांच्या वैधतेसह रोज ३ GB डेटा मिळणार आहे. यासोबत DisneyHotstar VIPचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. एअरटेल ते इतर नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉल आणि रोज १०० SMS मिळणार आहेत. यामध्ये ५५८ रुपयांचा ५६ दिवसांसाठी आणखी एक प्लॅन आहे. त्यामध्ये ३ GB डेटा, १०० SMS दरदिवशी यासोबत अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.