स्वस्तात जास्तीत जास्त मोबाईल डेटा देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याची स्पर्धा विविध टेलिकॉम कंपन्यांमध्ये सुरू आहे. रिलायन्स जिओनं ग्राहकांना स्वस्तात मस्त वेगवेगळा डेटा प्लान उपलब्ध करून दिल्यापासून प्रतिस्पर्धी कंपन्यांनीही ग्राहकांसाठी स्वस्त डेटा प्लानचं आमिश दाखवायला सुरूवात केली आहे. एअरटेलनं नुकताच २४९ चा प्लान लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये एअरटेल ग्राहकांना काय देतोय ते पाहूयात.
-एअरटेलच्या २४९ प्लानमध्ये दरदिवशी २ जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे.
– अनलिमिटेड लोकल कॉल
– मोफत एसटीडी, आऊटगोईंग आणि रोमिंग कॉल
– दरदिवसाला १०० एसएमएस
– हा प्लान थ्रीजी आणि फोरजी ग्राहकांसाठी आहे. एअरटेलच्या प्लानची व्हॅलिडिटी फक्त २८ दिवसांची असणार आहे.

रिलायन्स जिओ २९९ प्लान
– एअरटेलपेक्षा रिलायन्सनं ग्राहकांना १ जीबी अधिक डेटा देऊ केला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता दरदिवशी ३ जीबी डेटा मिळणार आहे.
– जिओनं देखील अनलिमिटेड लोकल, एसटीडी, आउटगोईंग आणि रोमिंग कॉलची सुविधा दिली आहे. तसेच ग्राहकांना १०० एसएमएस मोफत करता येणार आहेत. अर्थात याही प्लानची व्हॅलिडिटी ही २८ दिवसांची असणार आहे.