वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय्य तृतीया हा सण हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार शुभ आणि पवित्र आहे. पण यावेळी अक्षय तृतीया रविवारी २६ एप्रिल रोजी आली असून करोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन घेण्यात आला आहे. अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं पण लॉकडाउनमुळे दुकानं बंद आहेत. शिवाय काही जण घराबाहेर पडत नाही. अशांत अक्षय तृतीयेला काहीतरी खरेदी कसं करायचं असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला असेलं. तर टेन्शन नका घेऊ… घरबसल्या तुम्ही सोनं खरेदी करू शकता. कसं ते पाहूयात…

लॉकडाउनमध्ये सोनं खरेदी करायला तुम्हाला घराबाहेर पडायची गरज नाही. ऑनलाइन पद्धतीनं सोनं आणि चांदी खरेदी करू शका. त्यासाठी अनेक वेबसाइट तुम्हाला पर्याय देतात. उदाहरण म्हणून पाहा… टाटा ग्रुपचा ज्वलेरी ब्रँड तनिष्कमधून तुम्ही ऑनलाइन सोनं खरेदी करू शकता. अक्षय तृतीयाच्या दरम्यान घरबसल्या तुम्हाला याची डिलिव्हरी मिळेल.

महत्वाचं म्हणजे, ऑनलाइन ज्वलेरी खरेदी केल्यानंतर तनिष्क विविध ऑफर देत आहे. १८ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकता. या ऑफरमध्ये २५ टक्के मेकिंग चार्ज माफ करण्यात येणार आहे. तुम्ही ऑनलाइन सर्च करून तनिष्कच्या पोर्टलवर जाऊ शकता.