News Flash

चेक शर्ट विकत घेताना ‘या’ टिप्स लक्षात ठेवाच

चेक शर्ट खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात

चेक शर्ट खरेदी करायला गेल्यानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थि होत असतील. मला व्यवस्थित दिसेल का? माझ्यावर कोणता रंग सूट होईल का? ऑफिसमध्ये हे कपडे चालतील का? यासारखे अनेक प्रश्न पडत असतील. कारण.. स्टाइल म्हटल्यानंतर सर्वात पहिल्यांदा कपड्यांना पाहिलं जातं. त्यानंतर इतर गोष्टींकडे पाहतात. आज आपण पाहणार आहेत.. चेक शर्ट खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

शर्टचा रंग –
चेक शर्ट घेताना सर्वात आधी रंग पाहून मुलं खरेदी करतात. पण लक्षात ठेवा चेक शर्ट खरेदीकरताना न्यूट्रल रंगाच्या शर्टची निवड करा. तुमच्या अंगावर डार्क रंग सूट होत असेल तरच तसा चेक शर्ट खरेदी करा.

फॅब्रिक –

चेक शर्ट खरेदी करताना फॅब्रिककडे लक्ष ठेवा. अशा पद्धतीने फॅब्रिक निवडा जे उघडा आणि बटन लावल्यानंतर शर्ट चांगला दिसेल.

पॅटर्न –
चेक शर्ट खरेदी करताना रंगाबरोबरच पॅटर्नकडेही तेवढेच लक्ष द्या. जसे छोटे चेक्स शर्ट स्मार्ट लूक देतात तर मोठ्या चेक्सचे शर्ट कॅजुअल लूकसाठी परफेक्ट आहेत.

चेक्स आहे बोल्ड पॅटर्न –
चेक्सचे कपडे बोल्ड पॅटर्नमध्ये ग्राह्य धरले जातात. त्यामध्ये अनेक प्रकारचे विकल्प असतात. पुरूषांनी नेहमीच प्लेन किंवा लायनिंगवाले कपडे न घेता चेक्स शर्टांचीही निवड करावी. तुमचा लूक आधिक चांगला दिसू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 12:11 pm

Web Title: all about mens fashion wearing checked shirt with these small tips nck 90
Next Stories
1 Realme च्या लेटेस्ट X3 सीरिजचा भारतातील पहिला ‘सेल’, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
2 Ban झालेल्या टिकटॉकला पर्याय, ‘या’ भारतीय App ची ‘डिमांड’ वाढली
3 Realme च्या ‘बजेट’ स्मार्टफोनचा ‘सेल’, जाणून घ्या ऑफर्स
Just Now!
X