News Flash

क्रेटा-सेल्टॉसला टक्कर, येतेय दमदार SUV

देशातील सर्वात पॉवरफुल मिड-साइज एसयूव्ही ठरेल असा कंपनीचा दावा

Nissan Kicks ही कार नव्या BS6 इंजिनसह भारतीय बाजारात लवकरच लॉन्च होणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर या कारचे डिटेल्स शेअर केले आहेत. भारतीय बाजारात किक्सची ह्युंडई क्रेटा आणि किया सेल्टॉस यांसारख्या कारसोबत स्पर्धा असेल. याशिवाय, निसान कंपनी आपली बहुप्रतीक्षित सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइट देखील लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मॅग्नाइटची बेसिक किंमत 5.25 लाख रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये मॅग्नाइटची टक्कर मारुती ब्रिझा, ह्युंडई व्हेन्यू आणि टाटा निक्सॉन यांसारख्या शानदार गाड्यांसोबत असेल.

19 किंवा 20 मेपासून नवीन BS6 Nissan Kicks साठी बूकिंगला सुरूवात होण्याची शक्यता आहे. पण, लॉकडाउननुसार बूकिंगची तारीख बदलली जाऊ शकते.  BS6 Nissan Kicks मध्ये पॉवरफुल 1.3-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आले होते. हे 1.3-लीटर, 4-सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 154bhp ची ऊर्जा आणि 254Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनसह येणारी किक्स देशातील सर्वात पॉवरफुल मिड-साइज एसयूव्ही ठरेल असा दावा कंपनीने केला आहे. या इंजिनसोबत अॅडव्हान्स 8-स्टेप CVT गिअरबॉक्स आणि 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्यायही मिळेल.

नवं 1.3-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन Daimler आणि Nissan-Renault यांनी बनवलं आहे. या इंजिनचा वापर (अधिक पॉवरसह) मर्सिडीज A-क्लास सोबत काही ग्लोबल मॉडल्समध्येही करण्यात आला आहे. हे इंजिन केवळ टॉप-व्हेरिअंट्समध्येच मिळेल अशी माहिती आहे. बेसिक व्हेरिअंट्स्मध्ये आधीप्रमाणेच 106bhp पॉवर असलेले 1.5-लीटर पेट्रोल इंजिन मिळेल. बीएस-6 किक्स केवळ पेट्रोल इंजिन प्रकारातच उपलब्ध असेल.

निसान किक्स टर्बोमध्ये काही आकर्षक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. यात ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, हिल-स्टार्ट असिस्ट, हिल डीसेंट कंट्रोल आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. भारतीय बाजारात या गाडीची थेट स्पर्धा क्रेटा आणि सेल्टॉस या गाड्यांसोबत असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 2:58 pm

Web Title: all new bs6 compliant compact suv nissan kicks bookings know all details sas 89
Next Stories
1 तातडीने अपडेट करा Chrome, गुगलने दिली ‘वॉर्निंग’
2 महामारीत अशी वाढवा रोग प्रतिकारक शक्ती
3 YouTube आणतंय नवं फीचर, आता व्हिडिओसह मिळेल शॉपिंगचा पर्याय!
Just Now!
X