– डॉ. राजेश जरिया

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अलीकडेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन झाली. यामुळे, भारतातील मीडियामध्ये अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन हा विषय चर्चेत आला. परंतु, अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन म्हणजे काय आणि ती कशी टाळावी, याची माहिती फार कमी जणांना आहे.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Use This Epsom Salt Looking Like Rice For Flower Plants Anant Mogra Jaswandi
Video: तांदळासारखी दिसणारी ‘ही’ वस्तू वापरून फुलवा अनंताच्या रोपाची शोभा; भरपूर कळ्यांनी सजेल कुंडी
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन म्हणजे काय?
‘अ‍ॅलर्जी’ ही संज्ञा 1906 मध्ये क्लेमेन्स व्होन पिरक्वेट यांनी शोधली. विशिष्ट घटकांशी संपर्क आल्यावर, काही व्यक्तींमध्ये रिअ‍ॅक्टिविटी किंवा ‘हायपरसेन्सिटिविटी’ यांची लक्षणे व खुणा निर्माण होण्यासाठी दिसून येणारी असाधारण प्रोपेन्सिटी पिरक्वेट अधोरेखित करत असत.
शरीरातील प्रतिकार यंत्रणा संसर्ग, विषाणू व आजार यांच्यापासून आपल्या शरीराचे संरक्षण करत असते. कोणत्याही मार्गाने शरीरामध्ये एखाद्या बाहेरच्या घटकाचा प्रवेश झाला आणि हा घटक शरीरासाठी घातक आहे व त्यामुळे तो शरीराचा ‘शत्रू’ आहे, असे शरीरातील प्रतिकार यंत्रणेला वाटते तेव्हा अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन होते. प्रतिकार यंत्रणा त्या घटकापासून शरीराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करते. काही उपचारांसाठी दिलेल्या औषधांवर अशा प्रकारे रिअ‍ॅक्शन होते तेव्हा त्यास अ‍ॅलर्जिक ड्रग रिअ‍ॅक्शन किंवा हायपरसेन्सिटिविटी रिअ‍ॅक्शन म्हणतात, कारण ते औषध तसे घातक नसते, परंतु प्रतिकार यंत्रणा ते त्या प्रकारे स्वीकारते. अशी अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन करणाऱ्या घटकांना अ‍ॅलर्जन असे म्हणतात.

हे कसे घडते?
मानवी शरीरामध्ये सदैव अनेक प्रकारच्या केमिकल रिअ‍ॅक्शन घडत असतात. मॉलिक्युलर स्तरावर अनेकदा त्या मॉलिक्युलर आकारावर अवलंबून असतात. प्रतिकार यंत्रणा मॉलिक्युलच्या विशिष्ट आकारामुळे मॉलिक्युल ओळखते. दोन घटकांचे आकार सारखे असतील तर त्यांना ओळखण्यात प्रतिकार यंत्रणेची गफलत होऊ शकते, उदा: ड्रग मॉलिक्युल म्हणजे विषाणूचाच एक भाग आहे, असे वाटून विषाणूवर ज्या प्रकारे हल्ला करेल तसा हल्ला प्रतिकार यंत्रणा करू शकते. काही वेळा प्रतिकार यंत्रणा ड्रग मॉलिक्युललाच शत्रू समजू शकते व त्यास तसा प्रतिसाद देऊ शकते. अनेकदा, औषधालाच कोणता प्रतिसाद न देणे म्हणजे प्रतिकार यंत्रणा ड्रग मॉलिक्युलचे विश्लेषण करत असते. दुसऱ्या वेळी, प्रतिकार यंत्रणा प्रतिसाद देऊ शकते, कारण पहिल्यांदा केलेल्या विश्लेषणानुसार ड्रग मॉलिक्युल शत्रू असल्याचे स्मरणशक्ती सांगते.

सर्वांसाठी रिअ‍ॅक्शन सारखीच असते का?
फिजिओपॅथॉलॉजिकल स्तरावर, अंतिम मार्ग सर्वांसाठी समान असतो, परंतु अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शनचे 4 प्रकार आहेत:
• प्रकार I: तातडीची हायपरसेन्सिटिविटी, ज्यामध्ये प्रतिकार यंत्रणा तातडीने प्रतिसाद देते – अॅनाफिलॅक्टिक रिअॅक्शन हा अशा प्रकारे दिला जाणारा प्रतिसाद असतो. डर्मेटायटिस (उदा., हाइव्ह्ज, व्हील व रेडनेस) या लोकलाइज्ड अॅलर्जिक रिअॅक्शन असतात.
• प्रकार II: सायटोटॉक्सिक रिअॅक्शन (अँटिबॉडी-डिपेंडंट किंवा मेमरी अॅक्टिवेटेड).
• प्रकार III: इम्युन कॉम्प्लेक्स रिअॅक्शन.
• प्रकार IV: सेल-मेडिएटेड (डिलेड हायपरसेन्सिटिविटी)

रिअ‍ॅक्शनचा भाग म्हणून शरीर कोणती लक्षणे दाखवते?
अनेक प्रकारची लक्षणे आढळू शकतात. अ‍ॅलर्जीची लक्षणे सौम्य, विशिष्ट नसलेली खाज यापासून शरीरभर उष्ण वाटण्यापर्यंत, रॅशपर्यंत, तसेच मृत्यू ओढवू शकणाऱ्या फुल ब्लोन अ‍ॅनाफिलॅक्टिक शॉकपर्यंत निरनिराळी असू शकतात. सर्व लक्षणे व खुणा यांची सर्वंकष यादी पुढे दिली आहे: हाइव्ह्ज, त्वचेची किंवा डोळ्यांची जळजळ, स्किन रॅश, ओठ, जिभ किंवा तोंड सुजणे व धाप लागणे, ही काही सर्रास आढळणारी लक्षणे आहेत.  फारशी न आढळणारी लक्षणे आहेत, ओटीपोटात दुखणे किंवा क्रॅमप येणे, संभ्रम, डायरिया, धाप लागून श्वास घेणे अवघड होणे किंवा आवाज बसणे, गरगरणे, चक्कर येणे, नॉशिया, शरीराच्या विविध भागांमध्ये हाइव्ह्ज, उलट्या, हृदयाची धडधड वाढणे, रॅपिड पल्स.
काही लक्षणे औषध घेतल्यानंतर काही तासांनी दिसून येतात. सिरम सिकनेस हा ड्रग अ‍ॅलर्जीचा उशिरा दिसणारा प्रकार आहे. औषध किंवा लस घेतल्यावर त्याचा परिणाम एका आठवड्याने किंवा अधिक काळाने दिसून येतो.

अशा प्रकारची अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन कशी टाळावी?
अशा रिअ‍ॅक्शनचा काही भाग टाळता न येण्यासारखा असू शकतो. माहीत असलेले अ‍ॅलर्जन टाळावे, असे सुचवले जाते, परंतु अनेकदा पहिल्यांदा होणाऱ्या रिअ‍ॅक्शनमधले अ‍ॅलर्जन माहितीतले नसू शकतात. ड्रग रिअ‍ॅक्शनवर चर्चा करत असताना, पहिल्यांदा लहान डोस (त्यास टेस्ट डोस असे म्हटले जाते) घ्यावेत – कोणतेही नवे औषध घेत असताना, विशेषतः ते इंजेक्शनद्वारे घेतले जात असताना, अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन टाळण्यासाठी हा उत्तम निर्णय ठरतो.

औषध घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी?
A) भूतकाळातील अनुभवांवरून शिकावे: पूर्वी घेतलेल्या एखाद्या औषधामुळे अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन झाली असेल तर अशा औषधाची नोंद ठेवावी आणि डॉक्टर किंवा नर्स यांना त्याविषयी सांगावे.
B) इंट्राव्हेनस किंवा इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देण्यापूर्वी टेस्ट डोस द्यावा का, हे विचारावे.
C) संभाव्य अॅलर्जिक रिअॅक्शनवर तातडीने उपचार करणे शक्य असेल तेव्हा इंट्राव्हेनस किंवा इंट्रामस्क्युलर इंजेक्शन घेणे योग्य ठरते. असा प्रसंग उद्भवल्यास तातडीने मदत देण्यासाठी अनेक डॉक्टर त्यांच्या क्लिनिकमध्ये तरतूद करून ठेवतात.

(लेखक एमडी, कन्सल्टंट फिजिशिअन, हिंदूजा हॉस्पिटल, खार आहेत.)