17 July 2019

News Flash

व्हॉट्स अॅपमुळे गुगलकडून ‘हे’ लोकप्रिय अॅप बंद करण्याची घोषणा!

मार्च 2019 पर्यंत हे अॅप बंद होईल अशी घोषणा गुगलने केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

गुगलने आपलं लोकप्रिय मेसेजिंग अॅप Allo बंद करण्याची घोषणा केली आहे. सप्टेंबर 2016 मध्ये कंपनीने हे अॅप लाँच केलं होतं. मात्र अपेक्षेऐवढी लोकप्रियता या अॅपला न मिळाल्याने कंपनीने हे अॅप बंद करण्याची घोषणा केली आहे.

मार्च 2019 पर्यंत Allo बंद होईल. या अॅपमुळे बरंच काही शिकायला मिळालं,असं गुगलने एका ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच कंपनीने या अॅपमध्ये गुंतवणक करणं बंद केलं होतं, याऐवजी इतर प्रोजेक्ट्सवर कंपनीने जास्त भर दिला होता. मध्यंतरी काही नवीन फिचर्स कंपनीने या अॅपसाठी आणले होते, मात्र तरीही व्हॉट्सअॅपशी टक्कर देण्याऐवढी याची लोकप्रियता या अॅपला कधीही मिळाली नाही.

यामध्ये व्हिडीओ कॉलिंग फिचर दिलं नाहीये, याशिवाय फाइल शेअरिंग फिचरही देण्यात आलं नव्हतं. अॅलो अॅपद्वारे फोटो, लोकेशन आणि स्टिकर्स पाठवता येत होते मात्र,डॉक्युमेंट्स शेअर करता येत नव्हते. दुसरीकडे व्हॉट्स अॅपमध्ये ही सर्व फिचर्स बरीच लोकप्रिय आहेत.

First Published on December 6, 2018 1:52 pm

Web Title: allo will shutdown in march google confirms