हल्लीच्या या धकाधकीच्या दिवसांमध्ये मोबाईलला आणि अत्याधुनिक जीवनशैलीला जितकं महत्त्व दिलं जातं तितकं महत्त्व आपल्या आरोग्याला मात्र दिलं जात नाही. अनेकदा धकाधकीत आपण स्वत:कडे लक्ष देणं विसरतो. त्याचे परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यातून आपल्याला सहज दुसून येतात. जेवणाच्या वेळा, खात असलेले पदारथ, अपुरी झोप, प्रदूषण, ताण यांचा शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम दिसून येतो. त्वचा हे परिणाम दाखविणारा महत्त्वाचा घटक आहे. शरीराचा अतिसंवेदनशील भाग असणाऱ्या त्वचेवरुनही एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचा अंदाज सहज लावणं शक्य होतं. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी जाहिरातींमध्ये दाखवल्याप्रमाणे महागड्या क्रिम किंवा सौंदर्यप्रसाधनांचा वापर करण्याची आवश्यकता नसते, तर घरगुती उपचारांनीही त्वचेच्या समस्या दूर होऊ शकतात. त्यासाठी योग्य गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. त्वचेचं सौंदर्य आणि आरोग्य हे दोन्ही चांगले ठेवायचे असेल तर कोरफड आणि हळद हे अतिशय उपयुक्त पदार्थ आहेत. पाहूयात हळद आणि कोरफडीचे त्वचेच्या दृष्टीने होणारे फायदे…

वाढणारे वय लपण्यास मदत-

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
parents stand when it comes to selecting modelling career for their children
चौकट मोडताना : कचाकड्याचे जग
coconut oil and aloe vera for beautiful and glowing skin Benefits
उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? खोबऱ्याचं तेल अन् कोरफडीचं मिश्रण वाढवेल सौंदर्य
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?

वाढत्या वयोमानानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. या सुरकुत्या दिसू नयेत यासाठी ठराविक वयोगटातील महिला आणि पुरुष अनेक प्रयत्न करतात. मात्र त्याचा म्हणावा तितका फायदा होतो असे नाही. कोरफड आणि हळदीच्या वापरामुळे मात्र या सुरकुत्या कमी दिसण्यास मदत होते. १ टीस्पून नारळाचं तेल, १ टीस्पून कोरफडीचा गर आणि १ टीस्पून हळद या एकत्र करुन हा लेप चेहऱ्याला लावा. दोन मिनिटं हा लेप ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

त्वचेचे संसर्ग (खरुज, नायटा इ.) टाळण्यासाठी –

खरुज आणि नायटा यांसारख्या त्वचारोगांवर उपचार म्हणूनही कोरफड आणि हळदीचा वापर होतो. ज्या ठिकाणी नायटा किंवा खरुजाची लागण झाली आहे तिथे हळद आणि कोरफडीचा लेप लावल्यास तो भाग लवकर बरा होतो. हळद आणि कोरफड यांच्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे हे शक्य होतं. हा लेप तयार करण्यासाठी चमचाभर नारळाचं तेल, कोरफडीचा गर आणि हळद घेऊन ही पेस्ट त्वचेवर साधारण अर्ध्या तासासाठी लावून ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवा.

मुरुमं नाहीशी करण्यासाठी-

त्वचेच्या रंध्रांमध्ये प्रदूषणामुळे जिवजंतू शिरकाव करतात. त्यांचा नायनाट करुन त्वचेचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठीसुद्धा कोरफड आणि हळदीचा सर्रास केला जातो. यामुळे चेहऱ्यावर येणारी मुरुमं कमी होतात. चेहऱ्यावर लावण्यात येणारा हा लेप तयार करण्यासाठी एक चमचा हळद आणि कोरफडीचा गर आणि एक चमचा मध यांचं एकत्र मिश्रण करुन हे मिश्रण मुरुमं असणाऱ्या भागांवर साधारण पंधरा मिनिटांसाठी लावा आणि त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. काहीवेळा असे केल्यास मुरुमं कमी होण्यास मदत होते.

त्वचेचा रुक्षपणा कमी करण्यासाठी-

अनेकांची त्वचा कोरडी असते. अशांना हिवाळ्यात त्वचेची आग होण्याचा त्रास होते. पण त्वचेमध्ये असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाचा समतोल राखण्यासाठी कोरफड आणि हळद हे रामबाण उपाय ठरतात. ज्यासाठी १ टीस्पून हळद आणि कोरफडीचा गर आणि काकडीचा रस हे सर्व पदार्थ एकत्र करुन ही पेस्ट पंधरा ते वीस मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवावी आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.